Share Market Sakal
अर्थविश्व

‘या’ दोन सरकारी बँकांमधील शेअर तेजीत; मिळू शकतात ३८ टक्क्यांपर्यंत रिटर्न

बँकांच्या व्यवसायात वाढ चांगली झाली असून भविष्यातही ही गती कायम राहील

सकाळ डिजिटल टीम

दोन सरकारी बँकांतील समभागांमध्ये विशेष हालचाल दिसून येत आहे. कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोन्ही समभागांमध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गुरुवारी दोन्ही बँकांच्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या बँकांच्या व्यवसायात वाढ चांगली झाली असून भविष्यातही ही गती कायम राहील, असे तज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत या दोन बँकांच्या समभागांना पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्याची संधी आहे.

कॅनरा बँक

सध्याच्या २५९  रुपयांच्या किंमतीनुसार, २७% परतावा मिळू शकते. बँकेचा PAT (Profit After Tax ) २५३० कोटी इतका होता,  जो अंदाजापेक्षा चांगला आहे. सुधारित मार्जिन आणि कमी कर यामुळे नफा वाढला आहे. त्यामुळे बँकेची पत वाढली आहे. त्यामुळे या बँकेत गुंतवणुक केल्यास परतावा मिळण्याची शक्यता जास्त आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया

तज्ञांच्या मते, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये गुंतवणुक केल्यास सध्याच्या ४७ रुपयांच्या किंमतीनुसार, ३८ टक्के परतावा मिळणे अपेक्षित आहे. एनआयआय आणि इतर उत्पन्नात वाढ झाल्यामुळे बँकेचा नफा वाढला. बँकेच्या प्रत्येक विभागात कर्ज वाढ दिसून येत आहे. कॉर्पोरेट, कृषी, रिटेल आणि एमएसएमई क्षेत्रात चांगली वाढ झालेली दिसून येत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dussehra Rally Speech: ‘’मी वर्क फ्रॉम होम अन् फेसबुक लाईव्ह करणारा नाही’’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Shivsena Dasara Melava: ''...ही गोष्ट मान्य केली पाहिजे'', लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे भाजपवर बोलले

Dussehra Melava 2025 Live Update: हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट आहे का?- एकनाथ शिंदे

Uddhav Thackeray Dussehra Rally : उद्धव ठाकरेंचा भर पावसात दसरा मेळावा; संघ, मोदी अन् 'कमळाबाई' थेट निशाण्यावर, म्हणाले...

Durga Visarjan Tragedy : दसऱ्याच्या उत्सवाला गालबोट, दुर्गादेवीचे विसर्जन करताना ६ तरुण बुडाले, दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT