अर्थविश्व

डीएसकेंचा बंगला विक्रीला; किंमत आहे ... कोटी 

वृत्तसंस्था

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या समोरील अडचणीत वाढच होत चालली आहे.  डीएसकेंचा पुण्यातील राहत्या बंगल्याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून लिलाव करण्यात येणार आहे.  सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसकेंच्या पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील राहत्या बंगल्याचा पुढील महिन्यात 8 मार्चला लिलाव होणार आहे. या बंगल्याची 'बेस प्राईस' 66 कोटी 39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बँकेकडून या लिलावाची वृत्तपत्रात जाहिरात देखील देण्यात आली आहे.

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडीला लागून असलेल्या या आलिशान बंगल्यात. टेकडीवरील नैसर्गिक धबधबा देखील आहे. गुंतवणूकदारांचे सुमारे 230 कोटी रुपये थकवल्याने डीएसकेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय  मुंबई उच्च न्यायालयाकडून दोनदा दिलासा मिळाल्यांनतर डीएकेंनी मुंबई उच्च न्यायलयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT