अर्थविश्व

'जिप्सी'चे उत्पादन बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'जिप्सी' म्हटल तरी आपल्या डोळ्यासमोर डोंगराळ, वाळवंट, खडकाळ प्रदेशातील रस्त्यांवर धावनारे लष्करातील वाहन उभे राहते. भारतीय लष्कराची ओळख असलेल्या या मारूती सुझुकी कंपनीच्या जिप्सी वाहनाचे उत्पादन बंद करण्यात आले आहे.
'रश्लेन' च्या एका अहवालानुसार कंपनीने इ-मेलद्वारे आपल्या वितरकांना या संदर्भातील माहिती दिली. 1985 साली पहिल्यांदा बाजारात आलेली जिप्सी 33 वर्षानंतर बंद करण्यात आली. कंपनीने जिप्सीचे उत्पादन तातडीने बंद केले आहे. यासाठी वितरकांनी ग्राहकांकडून नवीन वाहनाची नोंदणी करून घेऊ नयेत असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

लोकांचा मोठा प्रतिसाद मिळालेले हे वाहन 1991 मध्ये पहिल्यांदा लष्कराने स्विकारले. त्यानंतर तब्बल 35 हजाराहून अधिक जिप्सी लष्कराच्या ताफ्यामध्ये सामील झाल्या. मागील वर्षी लष्कराकडून कंपनीला 4 हजार युनिट्सची सर्वाधिक ऑर्डर मिळाली होती.  अनेक चित्रपटांमध्ये भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांचे वाहन म्हणून या गाडीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. 500 किलो वजन घेऊन जाण्याची क्षमता असलेली ही गाडी कसल्याही खडकाळ रस्त्यांवर सहज चालत होती.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT