Commodity-Trading
Commodity-Trading 
अर्थविश्व

'बीएसई'वर आजपासून कमोडिटी ट्रेडिंग

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आजपासून कमोडिटी ट्रेडिंग सुरू होणार आहे. कमोडिटी डेरिव्हेटीव्हजमधील ट्रेडिंगसाठी 150 हून अधिक सदस्यांनी नोंदणी केली असल्याचे "बीएसई'ने म्हटले आहे. नुकताच भांडवली बाजार नियंत्रक सेबीने "बीएसई' आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (एनएसई) कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करण्याची परवानगी दिली होती.

सुरवातीला "बीएसई'मध्ये सोने आणि चांदी या कमोडिटीमध्ये फ्युचर्स ट्रेडिंग होणार आहे. कमोडिटी ट्रेडिंगमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी "बीएसई'ने पहिल्या वर्षासाठीचे व्यवहार शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कमोडिटी ट्रेडिंगसाठी 442 जणांनी गुंतवणूक करण्यासाठी इच्छा दर्शवली असल्याचे "बीएसई'ने म्हटले आहे. कमोडिटीसाठी शेअर बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे "बीएसई'चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आशीष चौहान यांनी सांगितले. एनर्जी कॉन्ट्रॅक्‍ट सुरू करण्यासंदर्भात सेबीकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे चौहान यांनी सांगितले. ज्यामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूमध्ये ट्रेडिंग करता येईल. दुसऱ्या टप्प्यात मेटल आणि ऍग्री कमोडिटींमध्ये ट्रेडिंग सुरू करण्यात येणार असल्याचे चौहान यांनी सांगितले. सध्या कमोडिटी ट्रेडिंग मोठ्या प्रमाणात एमसीएक्‍समध्ये केले जाते. बीएसईच्या कमोडिटी ट्रेडिंगमुळे गुंतवणूकदारांसाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT