construction materials price increase house is expensive aurangabad
construction materials price increase house is expensive aurangabad esakal
अर्थविश्व

घराचे स्वप्न होतेय महाग

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अगोदरच शहरात व परिसरात प्लॉटचे दर आवाक्याबाहेर गेले. त्यातच आता घर बांधण्यासाठी लागणारे सर्व साहित्य महाग झाल्याने घराच्या स्वप्नांना आर्थिक झळ बसतेय. त्यातच बांधकाम तसेच मजुरी महाग होत असल्याने बांधकाम व्यावसायिकसुद्धा अडचणी आले आहेत.मागील काही महिन्यांत स्टील, सिमेंट, विटा, वाळू, प्लॅस्टिक पाइप यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. मार्चमध्ये ५२ रुपयांना असणारे स्टील ८६ ते ९० रुपये प्रतिकिलोच्या घरात गेले, स्टीलला लागणारे लोखंड हे युक्रेनहून येते.

तेथून येणाऱ्या कच्च्या मालाची आवक घटल्याने स्टीलसाठी लागणारा कच्च्या मालासाठी कंपन्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागत असल्याने स्टीलचे दर वाढत आहे. तसेच प्लॅस्टिक पाइपच्या दरात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वीटभट्टीसाठी लागणारा कोळशा‍च्या दरात वाढ झालेली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी कोळशाची टंचाईसुद्धा होती. परिणामी विटांच्या दरामध्ये दरवाढ झाली. कोरोना काळात परराज्यातील बांधकाम मजुरांचे हाल झाले होते. त्यानंतर परराज्यातील मजूर परत महाराष्ट्रात येण्याचे प्रमाण काहीसे घटले, परिणामी मजुरी दर वाढत आहे. मध्यप्रदेशातील जवळपास ५००० मजूर औरंगाबादमध्ये काम करतात ते होळीसाठी परत जातात, आता परत मजुरांची टंचाई भासण्याची शक्यता आहे, असे औरंगाबाद बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन उपाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.

बांधकाम साहित्य नोव्हेंबर महिन्यातील दर मार्च महिना

सिमेंट प्रतिगोणी २७० ३७०

स्टील ६ ते ३२ एमएम ४० ९०

वाळू प्रतिब्रास ४००० ६५००

आर्टिफिशियल वाळू २७०० ३६००

अ‍ॅल्युमिनिअम १८० ३४०

पीव्हीसी पाइप १.७५ इंच ८० १५०

वीट ६ इंच ८००० १४०००

बांधकाम ठेकेदार प्रति स्के.फिट २२० २७०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT