lpg gas lpg gas
अर्थविश्व

घरगुती गॅस सिलिंडर महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

नामदेव कुंभार

Gas Cylinder Price Hike : इंधन दरवाढीने आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) दरांत पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरांत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या 14.2 किलोच्या LPG सिलिंडरचा दर राजधानी दिल्लीतील 859.5 रुपये झाला आहे. याआधी दिल्लीमध्ये या गॅस सिलिंडरची किंमत 834 रुपये इतकी होती. आर्थिक राजधानीमध्येही गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत गॅसची किंमत 834.5 रुपये इतकी होती. आता यामध्ये 25 रुपयांनी वाढ झाली असून मुंबईत गॅस 859.5 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्येही 14 किलोच्या घरगुती गॅसची किंमत 886 रुपये इतकी झाली आहे. याआधी कोलकातामध्ये गॅस सिलिंडर 861 रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये 875.5 तर लखनऊमध्ये 897.5 रुपयांना 14 किलोचा गॅस मिळेल. याचबरोबर 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर 68 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर 1618 रुपये झाला आहे.

मागील काही महिन्यांपासून सातत्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. एक जानेवारी 2021 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये प्रति सिलिंडर होती. 1 मार्च 2021 पर्यंत ही किंमत 819 वर पोहचली होती. एप्रिल महिन्यात त्यात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. मे महिन्यात सिलिंडरचा भाव 810 रुपये झाला होता. तर जून महिन्यात कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT