crude oil fall in international market Petrol-Diesel rates  sakal
अर्थविश्व

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त; पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. सध्या ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत ९१ डॉलर प्रति बॅरल इतकी आहे. दरम्यान कच्च्या तेलाचे भाव कमी झाले असले तरी देशातील पेट्रोल-डिेझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याबद्दल नुकतीच एक माहिती जारी केली आहे.

त्यानुसार सध्या देशात सर्वात स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल पोर्टब्लेअर येथे विकले जात आहे. तिथे पेट्रोलची किंमत ८४.१० रुपये प्रती लिटर तर डिझेलची किंमत ७९.७४ रुपये प्रती लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. याआधी २२ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील जकात कर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्राने जुलै महिन्यात पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. मात्र, देशातील इतर कुठल्याही राज्याने या दरम्यान किमती कमी करण्याचा प्रयत्न केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, मी 'इम्पोस्टर सिंड्रोम'चा सामना करत होतो! राहुल द्रविड नसते तर...

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

सूर्याचा प्रकोप सुरुच...! शुक्रवारपर्यंत उष्णतेचा ‘ऑरेज अ‍ॅलर्ट’, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

Mohammed Shami न खेळण्यामागचं कारण? इयान बिशप यांच्या प्रश्नावर रिषभ पंत गांगरला... त्याच्या हावभावामुळे काहीतरी बिनसल्याचं संशय

SCROLL FOR NEXT