Inflation rate sakal
अर्थविश्व

Inflation Rate : किरकोळ महागाई दरात घसरण कायम

जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने होरपळणाऱया सर्वसामान्यांसाठी आकड्यांच्या दुनियेतून दिलासादायक बातमी आली आहे.

मंगेश वैशंपायन

जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने होरपळणाऱया सर्वसामान्यांसाठी आकड्यांच्या दुनियेतून दिलासादायक बातमी आली आहे.

नवी दिल्ली - जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने होरपळणाऱया सर्वसामान्यांसाठी आकड्यांच्या दुनियेतून दिलासादायक बातमी आली आहे. मागच्या महिन्यात, नोव्हेंबरमध्ये देशातील किरकोळ चलनवाढीचा दर गेल्या ११ महिन्यतील नीचांकी म्हणजे ५.८८ टक्क्यांवर आला असल्याचे आज जाहीर करण्यात आले.

किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारी २०२२ पासून रिझर्व बँकेच्या ६ टक्क्यांच्या मर्यादेच्या वर राहिला होता. ६ टक्के ही चलनवाढ किंवा महागाईची सर्वसामान्य किंवा सहनशील पातळी मानली जाते. मागच्या वर्षी याच काळात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये देशातील किरकोळ चलनवाढीचा दर ५.६६ टक्के होता. मात्र २०२२ मध्ये महागाईचा आलेख सातत्याने वाढत गेला. दूध, भाजीपाला, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, अन्नधान्य या साऱया पदार्थांच्या दारंत सातत्याने वाढ होत गेली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो दर ०.३५ टक्क्यांनी वाढवून ६.२५ टक्क्यांवर नेला होता.

नोव्हेंबर महिन्यात मुख्यतः अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ६ टक्क्यांच्या खाली टक्क्यांच्या खाली आला. नॅशनल स्टॅटिस्टिकल कार्यालयाने (एनएसओ) ने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मानकापेक्षा खाली आलेली किरकोळ चलनवाढीची ११ महिन्यांतील ही पहिलीच वेळ आहे. किरकोळ चलनवाढीचा दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची जबाबदारी रिझर्व बॅंकेकडे असते. ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई ऑक्टोबर 2022 मध्ये ६.७७ टक्के आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ४.९१ टक्के होती. एनएसओ च्या आकडेवारीनुसार अन्नधान्य चलनवाढ मागील महिन्यात ७.०१ टक्क्यांवरून ४.६७ टक्क्यांपर्यंत घटली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT