home-appliances 
अर्थविश्व

होम अप्लायन्सेसची मागणी वाढतेय

वृत्तसंस्था

पुणे - बदलत्या पिढीमुळे आणि जीवनशैलीमुळे होम अप्लायन्सेसची मागणी भारतात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे भारतात आगामी काळात होम अप्लायन्स क्षेत्रात मोठी वाढ होईल, असे मत ‘बीएसएच होम अप्लायन्सेस’ कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज बहल यांनी व्यक्त केले.

सकाळ माध्यम समूहाच्या कार्यालयाला बहल यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी भारतातील होम अप्लायन्स क्षेत्राची वाढती बाजारपेठ, मागील दोन दशकांत या क्षेत्रात झालेले बदल आणि भविष्यातील आव्हाने यासंदर्भात संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘ओव्हन, वॉशिंग मशिन, डिश क्‍लीनर, मिक्‍सर ग्राइंडरसारख्या गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत बॉशने स्थान निर्माण केले आहे. कंपनी ग्राहकांना नेमके काय हवे, यावर भर देते. महिलांचे दैनंदिन कामकाज सुकर व्हावे, यासाठी संशोधन आणि विकासाकडे लक्ष दिले जात आहे. प्रदूषण कमी करणारी नवीन स्वरूपाची चूलसुद्धा कंपनीने विकसित केली आहे.’’ 

‘‘भारतातील ग्राहकांच्या गरजा बदलत असून, तंत्रज्ञानातील नवीन संशोधनाचाही यात महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही कोणतेही उत्पादन विकसित करताना भारतीयांच्या गरजा आणि त्यांची मानसिकता लक्षात घेतो. भारतात महानगरांपासून छोट्या शहरांपर्यत वेगवेगळ्या प्रकारची बाजारपेठ आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे ठरत आहे,’’ असे त्यांनी सांगितले. 

‘‘मागील वर्षभरात बॉशने तंत्रज्ञानकौशल्य आणि ग्राहकाभिमुखतेच्या जोरावर ३० टक्के व्यवसायवृद्धी साधली आहे. कंपनीचे बंगळूरमध्ये संशोधन व विकास केंद्र आणि चेन्नईत उत्पादन प्रकल्प आहे. भविष्यातील आव्हानांसाठी कंपनी तयार आहे,’’ असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Farmer Loan Waiver : वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; 10 कोटी 20 लाखांचा लाभ मंजूर

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Marathi News Live Updates : भंडारा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

SCROLL FOR NEXT