अर्थविश्व

कोणाच्या ‘पीएफ’चे व्याज करपात्र होणार?

डॉ. दिलीप सातभाई

एक एप्रिल २०२१ नंतर भविष्यनिर्वाह निधीच्या सदस्याने, निर्धारित केलेल्या भरावयाच्या योगदानाची वार्षिक रक्कम अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास, त्याच्या खात्यात जमा होणारे सर्व व्याज आता करपात्र होणार आहे. अशी रक्कम कर्मचाऱ्याला दिलेल्या ‘सुविधा’ (perquisites) म्हणून उत्पन्नात समाविष्ट केली जाणार आहे. 

सध्या प्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(११) अंतर्गत भविष्यनिर्वाह निधीवर (पीएफ) मिळणारे व्याज संपूर्णतः (कोणत्याही मर्यादेशिवाय) करमुक्त आहे. उपकलम (१२) अंतर्गत चौथ्या अनुसूचीच्या भाग ‘ए’च्या नियम ८ मध्ये दिलेल्या मर्यादेपर्यंत, ‘संचित शिल्लक’ मान्यताप्राप्त भविष्यनिर्वाह निधीत भाग घेत असलेल्या कर्मचाऱ्‍यास देय झाल्यानंतरही पूर्णतः करमुक्त आहे. या तरतुदीचा फायदा घेऊन अनेक कर्मचारी या फंडामध्ये मोठ्या प्रमाणात स्वतःहून (व्हॉलंटरी) योगदान देत असत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात कोणत्याही मर्यादेशिवाय करमुक्त व्याज मिळत होते. 

व्याजाची रक्कम उत्पन्नात समाविष्ट
याचा फायदा मोठ्या कंपन्याच्या बड्या अधिकाऱ्यांना अधिक होत होता, कारण त्यांचे वेतनही काही कोटी रुपयांमध्ये होते. उदा. अगदी पाच कोटी रुपयांचे वेतन असणारी व्यक्ती दरवर्षी चक्रवाढ व्याज पद्धतीने साठ लाख रुपयांच्या प्रत्येकी स्वतःच्या व कंपनीच्या योगदानावर करमुक्त व्याजाच्या लाभ घेत होती. यात आता बदल करण्यात आला आहे. एक एप्रिल २०२१ नंतर भविष्यनिर्वाह निधीच्या सदस्याने, निर्धारित केलेल्या भरावयाच्या योगदानाची वार्षिक रक्कम अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास, त्याच्या खात्यात जमा होणारे सर्व व्याज आता करपात्र होणार आहे. अशी रक्कम कर्मचाऱ्याला दिलेल्या ‘सुविधा’ (perquisites) म्हणून उत्पन्नात समाविष्ट केली जाणार आहे.

‘टेक होम सॅलरी’ कमी होणार
असे करदाते उच्च कर गटवारीत असल्याने विधेयक मंजूर होताना, अन्य प्राप्तिकर दर ठरविलेला नाही. पण सर्वसाधारणपणे ३०.८ टक्के दराने या करदात्याच्या खात्यात जमा केल्या गेलेल्या व्याजावर कर लागणार आहे. याचा अर्थ व्याजाचे पैसे प्रत्यक्षात हाती न येता देखील त्यावर त्याच वर्षात प्राप्तिकर भरावा लागणार आहे. याचा भुर्दंड मध्यमवर्गीयांना जाणवणार असल्याने घरी येणारे वेतन (टेक होम सॅलरी) कमी होणार आहे.

थोडक्यात, ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार व महागाई भत्ता यांची एकत्रित वार्षिक बेरीज रु. २०.८३ लाख किंवा अधिक असल्यास, त्याचे ‘पीएफ’मधील योगदानावर मिळणाऱ्या व्याजाचे उत्पन्न पूर्णतः करपात्र होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक योगदान रु. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल, त्यांना या तरतुदी लागू नसल्याने त्यांचे पूर्वीप्रमाणेच व्याज करमुक्त असणार आहे. 

‘पीपीएफ’चे व्याज मात्र करमुक्त
याच कलमांतर्गत सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावर (पीपीएफ) मिळणारे व्याजदेखील करमुक्त आहे. या नव्या तरतुदी या योजनेतील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या करमुक्त व्याजास लागू शकतात. तथापि, यातील वार्षिक गुंतवणुकीची कमाल मर्यादा दीड लाख रुपये असल्याने या गुंतवणुकीतून मिळणारे व्याज अजूनही करमुक्त राहणार आहे, हा दिलासा मध्यमवर्गीयांना नक्कीच लाखमोलाचा ठरावा.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT