Jaydeep Singh
Jaydeep Singh Sakal
अर्थविश्व

सक्सेस स्टोरी : डोळे दिपविणारे वेतन!

डॉ. वीरेंद्र ताटके

जगात अशी एक व्यक्ती आहे जिचे वार्षिक वेतन (फक्त) १७,५०० कोटी रुपये एवढे आहे आणि ती व्यक्ती मूळ भारतीय वंशाची आहे, हे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

एखाद्या कंपनीच्या ‘सीईओ’ला जास्तीतजास्त किती वेतन असू शकते? काही अंदाज?

एक कोटी रुपये? दहा कोटी रुपये? शंभर कोटी रुपये? एक हजार कोटी रुपये? दहा हजार कोटी रुपये?...आपला अंदाज चुकला आहे!

जगात अशी एक व्यक्ती आहे जिचे वार्षिक वेतन (फक्त) १७,५०० कोटी रुपये एवढे आहे आणि ती व्यक्ती मूळ भारतीय वंशाची आहे, हे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. जगात सर्वांत अधिक वेतन घेणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे जगदीप सिंग! जगदीप सिंग हे क्वांटमस्केप या कंपनीचे ‘सीईओ’ आहेत.

जगदीप सिंग हे मूळचे भारतीय असून, त्यांनी मेरीलँड विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंग विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इंजिनियरिंगमध्येच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जबाबदारीची पदे सांभाळली; तसेच अनेक कंपन्या सुरु करण्यात सहभाग घेतला. २०१० या वर्षी त्यांच्या पुढाकाराखाली क्वांटमस्केप या कंपनीची स्थापना झाली.

ही कंपनी इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. ‘भविष्यातील कार’ मानल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारचा वापर जगभरात गेल्या काही वर्षांत वाढला आहे. प्रदूषणाला आळा बसत असल्यामुळे विविध देशातील सरकारे देखील इलेक्ट्रिक कारच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. या क्षेत्रात संशोधनाला मोठा वाव आहे, हे लक्षात घेऊन या कंपनीची स्थापना केली गेली. इलेक्ट्रिक कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम बॅटरीचे आयुष्य वाढवणे, त्याला अधिक चांगला, स्वस्त, अधिक टिकाऊ पर्याय शोधणे अशा क्षेत्रात ही कंपनी संशोधन करते. इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीच्या क्षमतेत आश्चर्यकारक वाढ करून या क्षेत्रात क्रांती घडवणे, हे या कंपनीचे ब्रीद आहे. विशेष म्हणजे, ऑटोमोबाईल क्षेत्रातील फोक्सवॅगन कंपनी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती बिल गेट्स यांची या कंपनीत गुंतवणूक आहे.

क्वांटमस्केप कंपनीच्या आतापर्यंतच्या प्रगतीमध्ये जगदीप सिंग यांचा मोठा वाटा आहे. त्यांना एवढे मोठे ‘पॅकेज’ मिळाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या; पण कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यामागील भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे, की आम्ही नेहमीच अतिशय अवघड अशी उद्दिष्टे ठेवतो आणि ती साध्य करण्यासाठी संबंधित लोकांना सातत्याने प्रोत्साहित करत असतो.

जगदीप सिंग यांचे भलेमोठे पॅकेज हा त्या प्रोत्साहनाचाच एक भाग मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या कंपनीच्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतदेखील त्यांच्या या वेतनवाढीला मान्यता मिळाली.

अर्थात जगदीप सिंग यांना येणाऱ्या काळात स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. जगभरातील सर्व इलेक्ट्रिक कार उत्पादकांना उपयोग होईल असे क्रांतिकारक काम जगदीप सिंग आणि त्यांची टीम करेल, अशी आशा करून त्यांना शुभेच्छा देऊया!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT