epf
epf 
अर्थविश्व

'ईपीएफ'च्या व्याजाला कात्री 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्यांना आर्थिक वर्ष 2017-18 साठी 8.55 टक्के व्याजदर बुधवारी जाहीर केला. मागील आर्थिक वर्षात हा व्याजदर 8.65 टक्के होता. 

"ईपीएफओ'कडून व्याजदरात झालेली ही सलग तिसरी कपात आहे. 2015-16 मध्ये हा व्याजदर 8.8 टक्के होता. तो 2016-17 मध्ये 8.65 टक्के करण्यात आला. "ईपीएफओ'चे सुमारे सहा कोटींपेक्षा अधिक सदस्य आहेत. "ईपीएफओ'च्या विश्‍वस्त मंडळाने व्याजदराबाबतचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर हा व्याजदर प्रत्यक्ष लागू होईल. 

याविषयी बोलताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार म्हणाले, की संघटनेला रोख्यातील गुंतवणुकीतून आठ टक्के परतावा मिळाला आहे. संघटनेने भांडवली बाजारातील गुंतवणुकीतील काही हिस्सा विकल्याने 8.55 टक्के व्याज देणे शक्‍य होणार आहे. व्याजदर 8.55 टक्के करण्याच्या निर्णयावर कामगार संघटना सहमती दर्शवतील, अशी आशा आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT