EPFO  esakal
अर्थविश्व

EPFO खातं असेल तर 7 लाखांचा फायदा, पैसे थेट बँकेत जमा होणार!

ओमकार वाबळे

तुमचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) पीएफ खाते असेल, तर तुम्हाला काहीही न करता 7 लाख रुपयांचा लाभ मिळेल. EPFO ​​सदस्यांना कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI) अंतर्गत विमा संरक्षणाची सुविधा मिळते. या योजनेत, नॉमिनीला 7 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते. खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना 7 लाख रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणाचा मोफत लाभ मिळतो.

कोणत्या परिस्थितीत पैसे मिळणार?

आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कर्मचारी किंवा नामनिर्देशित व्यक्तीच्या वतीने EDLI योजनेवर दावा केला जाऊ शकतो. आता ज्या कर्मचाऱ्यांनी मृत्यूच्या लगेच आधी 12 महिन्यांच्या आत एकापेक्षा जास्त आस्थापनांमध्ये काम केले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या पीडित कुटुंबालाही हे कव्हर उपलब्ध आहे.

तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत

कर्मचार्‍याला योजनेंतर्गत कोणतेही पेमेंट करावे लागणार नाही. योजनेंतर्गत नामनिर्देशन नसल्यास, मृत कर्मचाऱ्याची पत्नी, अविवाहित मुली आणि अल्पवयीन मुलगे लाभार्थी म्हणून गणले जातील. जर दावेदार अल्पवयीन (18 वर्षांपेक्षा कमी) असेल, तर त्याचे पालक त्याच्या वतीने दावा करू शकतात.

'ही' कागदपत्रे आवश्यक

भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढण्यासाठी विमा संरक्षणाचा फॉर्म-5 IF देखील नियोक्त्याकडे सादर करावा लागतो. नियोक्ता या फॉर्मची पडताळणी करेल. ते उपलब्ध नसल्यास, फॉर्म राजपत्रित अधिकारी, दंडाधिकारी, ग्रामपंचायत अध्यक्ष, अध्यक्ष/सचिव/महानगरपालिका किंवा जिल्हा स्थानिक मंडळाचे सदस्य, पोस्टमास्टर किंवा सब पोस्टमास्टर यांच्याकडून व्हेरीफाय केला जाऊ शकतो.

ई-नॉमिनेशनची सुविधाही सुरू

ईपीएफओने आता नॉमिनीची माहिती देण्यासाठी ई-नॉमिनेशनची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ज्यांची नोंदणी झालेली नाही, त्यांना संधी मिळत आहे. त्यानंतर नॉमिनीचे नाव, जन्मतारीख यासारखी माहिती ऑनलाइन अपडेट केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS Test: W,W,W... शून्यावर ३ विकेट्स अन् २७ वर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियासमोर विंडीजची शरणागती, भारताचा लाजीरवाणा विक्रमही मोडला

आनंदाची बातमी! 'गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार': मंत्री प्रताप सरनाईक; वाहनदुरुस्ती पथक तैनात करणार

Latest Marathi News Live Updates : भोयर बायपासवर रस्त्याच्या मागणीसाठी रास्तारोको

Ganesh Festival Travel: बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

Shivsena : 'राजू शेट्टींची प्रकरणे माझ्याकडे, सतेज पाटील बगलबच्च्यांना पुढे करतात'; 'शक्तिपीठ'वरून क्षीरसागरांच्या शिलेदाराची टीका

SCROLL FOR NEXT