Tata Group Shares Sakal
अर्थविश्व

Tata Group च्या या स्टॉकवर तज्ज्ञांचा वाढता विश्वास

Tata Group च्या स्टॉकवर तज्ज्ञांचा विश्वास वाढल्याचं दिसत आहे. काही दिग्गज गुंतवणूकदारांनी Tata Group च्या शेअर्सची खरेदी केली आहे.

शिल्पा गुजर

टाटा ग्रूपच्या टाटा मोटर्सचे (Tata Motors) शेअर्स येत्या काळात आणखी चांगले परफॉर्म करणार असल्याचा विश्वास शेअर बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे. शेअर बाजारातील (Share Market) दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala) हे त्यापैकीच एक. नुकताच टाटा समूहाच्या टाटा मोटर्समधील (Tata Motors) हिस्सा झुनझुनवाला यांनी वाढवला आणि डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 25 लाख नवीन शेअर्स खरेदी केले. कंपनीतील त्यांची होल्डिंग 1.18 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. गेल्या एका वर्षात झुनझुनवाला यांना टाटा मोटर्समध्ये जवळपास 100 टक्के परतावा मिळाला आहे.

टाटा मोटर्सवर वाढता विश्वास-

बीएसई वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या डिसेंबर 2021 (Q3FY22) तिमाहीसाठी टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्समधील त्यांचा हिस्सा 1.11 टक्क्यांवरून (3,67,50,000 शेअर्स) 1.18 टक्के (3,92,50,000 इक्विटी शेअर्स) पर्यंत वाढवला आहे.

टाटा मोटर्सवर ब्रोकरेज 'बाय' रेटिंग (Tata Motorsover Brokerage 'Buy' Rating)-

मोतीलाल ओसवाल यांनी त्यांच्या टॉप रिसर्च आयडियामध्ये टाटा मोटर्सची निवड केली आहे. ब्रोकरेजने 'BUY' रेटिंग दिले आहे. तर टारगेट 610 रुपये ठेवण्यात आले आहे. 18 जानेवारी 2022 रोजी, ट्रेडिंग सत्रादरम्यान टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 511 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 99 रुपये किंवा सध्याच्या किमतीच्या सुमारे 19 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर हा शेअर जवळपास 100 टक्के वाढला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला आहे.

प्रवासी वाहन विभागात टाटा मोटर्सचा नवीन मॉडेल्स लाँच करत आहे. त्याच वेळी, कंपनीचे लक्ष इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटवर देखील आहे. आताही, टाटा मोटर्सचा देशांतर्गत बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहन विभागातील व्यवसाय मोठा आहे.

टाटा मोटर्सकडून दरवाढीची घोषणा (Tata Motors announces price hike)-

टाटा मोटर्सने मंगळवारी प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली. यानंतर 19 जानेवारीपासून अर्थात आजपासून टाटाच्या कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. मात्र, या निर्णयाचा 18 तारखेपर्यंतच्या बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने किमतीत सरासरी 0.90 टक्के वाढ जाहीर केली आहे. वाढीव किंमतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आपण सहन करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे, दूसरीकडे इनपुट कॉस्टमध्ये जास्त वाढ झाल्याने आम्हाला किमान किंमत वाढवण्यास भाग झाल्याचे कंपनीने सांगितले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: T20 सामन्यात सुपर ओव्हरचा ड्रामा! अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद, CSK च्या गोलंदाजांनं दोनदा धाडलं माघारी

Latest Marathi News Live Update : वर्सोवा बीचवर महिलेला जीवे धमकी; आरोपीकडून पिस्तूल-चॉपर जप्त

Vitamin C Serum: हिवाळ्यातील ड्राय स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'व्हिटॅमिन C' सीरम, जाणून घ्या सोपे आणि उत्तम उपाय

Kolhapur Politics : अपक्षांचा खेळ उधळणार? कागल निवडणुकीत मतांसाठी गट-तटांची धडपड आणि राजकीय रणनीतीने तापला माहोल

Video: भिंत पाडण्यासाठी आमदार स्वतः चढले जेसीबीवर; दिलीप लांडेंचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT