file photo
file photo 
अर्थविश्व

कुंपणानेच खाल्ले शेत : पीएमसी बॅंक गैरव्यवहार प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

वरियाम सिंग याने पंजाबमध्ये ‘लेमन ट्री’ नावाचे पंचतारांकित हॉटेल विकत घेतले आहे. हा व्यवहार मनमोहन अहुजा नावाच्या व्यक्तीमार्फत झाला असून, पोलिस चौकशीसाठी त्याचा शोध घेत आहेत. सिंग याने हरियाना व हिमाचल प्रदेशातही काही मालमत्ता खरेदी केल्याचे पोलिसांनी सांगितले. सिंग व त्याच्या कुटुंबीयांनी अमेरिकेतही गुंतवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पीएमसी बॅंकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याने एचडीआयएलशी संबंधित काही कंपन्यांच्या खात्यांतून पैसे काढले. ही रक्कम हवाला जाळ्यामार्फत दुबईतील मेहता नावाच्या व्यक्तीला पाठवण्यात आली. त्यानंतर हीच रक्कम बॅंकेत जमा करण्यात आली, असे थॉमस याच्या चौकशीत पुढे आले आहे. पुण्यात त्याच्या नऊ मालमत्ता असल्याची माहितीही मिळाली असून, पोलिस पडताळणी करत आहेत. 

३,८३० कोटींच्या मालमत्ता
पीएमसी बॅंक प्रकरणात आतापर्यंत ३,८३० कोटी रुपयांच्या मालमत्तांची ओळख पटवण्यात आली आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १० ठिकाणी शोधमोहिमा राबवून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. आतापर्यंत १० महागड्या कार, ६६ कोटींचे दागिने, अलिबागनजीक आवास येथील मालमत्ता, दीड कोटींच्या मुदत ठेवी आदी मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 
या प्रकरणातील ४४ संशयास्पद खात्यांपैकी १० खाती एचडीआयएल समूहाशी संबंधित आहेत. या खात्यांमधील गैरव्यवहार लपवण्यासाठी सुमारे २१ हजार बनावट खाती निर्माण करण्यात आली होती. या खात्यांना बॅंकेतील निष्क्रिय (डॉर्मंट) खात्यांच्या धारकांची नावे देण्यात आली होती. हीच खाती सुरुवातीला रिझर्व्ह बॅंकेला दाखवण्यात आली होती. या खात्यांद्वारे ४३५५ कोटींचे मुद्दल व व्याज बुडवण्यात आल्याचे दाखवण्यात आले.
रिझर्व्ह बॅंकेने नेमलेले प्रशासक जसबीरसिंग मठ्ठा यांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर पीएमसी बॅंकेचे निलंबित संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वरियाम सिंग, इतर अधिकारी, एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवा व सारंग वाधवा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे ईडीनेही गुन्हा दाखल केला होता. कट रचून खोटी कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा फसवणुकीसाठी वापर करणे या कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

कागदपत्रे ताब्यात
एचडीआयएलशी संबंधित ८० मालमत्तांची कागदपत्रेही सापडली आहेत. खार येथील पाली हिल भागात तीन फ्लॅट, सिंधुदुर्ग येथे १२५ कोटींची जमीन, हैदराबाद येथे ७२ एकर जमीन, नोएडा येथे ८० एकर जमीन, मुंबईतील ११० कोटींचा एक बंगला आदींचा या मालमत्तांमध्ये समावेश आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT