financial knowledge 44 percent  increase GST collection May delhi
financial knowledge 44 percent increase GST collection May delhi sakal
अर्थविश्व

जीएसटी संकलनात मेमध्ये ४४ टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मे महिन्यात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी संकलन एक लाख ४० हजार ८८५ कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ते ९७ हजार ८२१ कोटी रुपये होते. त्या तुलनेत या मे महिन्यात त्यात ४४ टक्के वाढ झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत मात्र त्यात १६ टक्के घट झाली आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक १.६८ लाख कोटी संकलन झाले होते, अशी माहिती अर्थमंत्रालयाने दिली आहे. जीएसटी लागू केल्यापासून चौथ्यांदा जीएसटी संकलनाने १.४० लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मार्च २०२२ पासून सलग तिसऱ्या महिन्यात आयात मालाच्या महसुलात ४३ टक्के वाढ झाली आहे.

मे महिन्यातील या दमदार जीएसटी संकलनामुळे सरकारची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली असून, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. महागाई कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या कर कपातीचा परिणामही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आर्थिक वर्षाचा पहिला महिना, एप्रिलच्या परताव्याशी निगडीत असलेले मे महिन्यातील जीएसटी संकलन एप्रिलच्या तुलनेत नेहमीच कमी असते, मात्र तरीही मे महिन्यात जीएसटी महसूलाने १.४० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे ही बाब उत्साहवर्धक आहे, असे मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर संकलन २५,०३६ कोटी, राज्यस्तरीय वस्तू आणि सेवा कर संकलन ३२,००१ कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन ७३, ३४५ कोटी रुपये झाले आहे. केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल अनुक्रमे ५२,९६० कोटी रुपये आणि ५५,१२४ कोटी रुपये होता.

केवळ २५ हजार कोटी रुपये संकलन असूनही केंद्राने राज्यांची ३१मेपर्यंतची भरपाई दिली आहे. महाराष्ट्राला ८६,९१२ कोटी रुपये जीएसटी भरपाई मंजूर केली आहे. राज्यांना त्यांच्या विकास योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करता यावी, विशेषत: भांडवली खर्चाचे नियोजन करता यावे यासाठी ही भरपाई देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT