अर्थविश्व

'एनएसई'ने केली 3 हजार 136 कोटींच्या निधीची उभारणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) इमर्ज व्यासपीठावर 200 व्या कंपनीची नोंदणी करण्यात आली. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग तसेच भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि "एनएसई"चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांच्या उपस्थितीत गुरूवारी (ता.22) एनएसई इमर्ज या व्यासपीठावर 200 व्या एसएमई कंपनीच्या सूचिबद्धता करण्यात आली. मागील सात वर्षांत या मंचावर 3 हजार 136 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.

सूचिबद्ध लघू व मध्यम कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल हे 8 हजार 800 कोटी आहे. 22 एसएमई कंपन्यांनी मुख्य एनएसई बाजारमंचावर स्थलांतर करण्याइतकी प्रगती साधली आहे. 
एनएसई इमर्ज एसएमई बाजारमंचावर सूचिबद्ध झालेली वंडर फायब्रोमॅट्‌स लिमिटेड ही 200 वी कंपनी ठरली.

मध्य भारत अँग्रो प्रॉडक्‍ट्‌स लिमिटेड आणि कृष्णा फॉसकेम लिमिटेड या दोन कंपन्यांच्या समभागांचे व्यवहार आज एसएमई व्यासपीठावरून मुख्य एनएसई बाजारमंचावर स्थलांतरित झाले आहेत."एमएसएमई" क्षेत्राचा देशाच्या जीडीपीमध्ये 29 टक्के वाटा असून पुढील पाच वर्षात तो आम्ही 50 टक्‍क्‍यांवर नेणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

लघू आणि मध्यम उद्योगांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या पाठबळासाठी एनएसई प्रयत्नशील आहे. पारंपारिक निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांपासून ते नवीन अर्थव्यवस्थेतील स्टार्ट-अप्स अशा सर्वांसाठी "एनएसई"ने नेहमीच दमदार भांडवल उभारणीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न राखला असल्याचे "एनएसई"चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT