Gautam Adani  esakal
अर्थविश्व

अदानी समूहाचे गुंतवणूकदार झाले, मालामाल 1 लाखाचे झाले 83 लाख

शेअरबाजारा मुळे त्यांच्या संपत्तीत 17 पट वाढ

सकाळ डिजिटल टीम

अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी हे जगातील श्रीमंतांच्या यादीत 3 क्रमांकाचे आहेत. शेअरबाजारामुळे त्यांच्या संपत्तीत 17 पट वाढ झाली आहे. यासोबतच अदानी समूहाच्या कंपनीचे शेअर्समध्ये 5 वर्षासाठी गुतंवणूक करनारे गुतंवणूकदार मालामाल झाले आहे.

अदानी एंटरप्रायजेस

अदानी एंटरप्रायजेसच्या एका शेअरची किमत 1 सप्टेंबर 2017 ला 136.60 रूपये होती. या मंगळवारी 30 ऑगस्टला 2022 ला याची किमत 3192.60 रूपयांवर बंद झाली आहे. या पाच वर्षात अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्स मध्ये 23 पटी वाढ झाली आहे.

अदानी पावर

अदानी पावर शेअर्सची किमत 5 वर्षा पुर्वी 1 सप्टेंबर 2017 ला 32.35 रूपये होती. त्याची मंगळवारी 30 ऑगस्टला किमत 413.95 रूपयावर बंद झाली. या पाच वार्षात याशेअरची किमत 12 पटीने वाढली आहे.

अदानी ग्रीन

अदानी ग्रीनच्या एका शेअरची किमत 22 जून 2018 ला फक्त 29.45 रूपये होती. मंगळवारी याची किमत 2447.10 रूपयांवर बंद झाली. म्हणजे गेल्या 4 वर्षात हा शेअर 83 पटीने वाढला. 4 वर्षापूर्वी ज्यालोकांनी यात 1 लाख रूपये गुंतवले असतील त्यांचे एक लाख आता 83 लाख झाले आहेत.

अदानी पोर्ट

1 सप्टेंबर 2017 ला अदानी पोर्ट शेअरची किमत 394.90 रूपये होती, आणि 30 ऑगस्टला 840 रूपयांवर बंद झाली. त्या शेअरची किमत गेल्या 4 वर्षात 112 पटीने वाढली आहे.

अदानी टोटल गॅस

15 जानेवारी 2021 ला अदानी टोटल गॅसच्या शेअरची किंमत 359.95 रुपयांवर बंद झाली. मंगळवारी त्याची किमत 3750 रुपयांवर पोहोचली. म्हणजेच, 2 वर्षात जवळपास 10 पट वाढली आहे.

अदानी ट्रांसमिशन

अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स पाच वर्षांत 3015.90 टक्क्यांनी वाढले आहेत. 1 सप्टेंबर 2017 ला 127.70 वर बंद झालेला स्टॉक 30 ऑगस्ट 2022 ला 3979 रूपयांवर बंद झाला. म्हणजे गेल्या पाच वर्षांत 31 पटीने वाढ झाली आहे.

अदानी विल्मर

अदानी समूहाची सातवी कंपनी अदानी विल्मार, या वर्षी फेब्रुवारीमध्ये अधिकृत झाली होती, ती कंपनी गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहे. अवघ्या सात महिन्यांपेक्षा कमी वेळेत, सुमारे 82 टक्के परतावा दिला आहे. हा शेअर आता 227 रुपयांच्या नीचांकीवरून 693 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 878 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT