Get UAN number easily by seating at home
Get UAN number easily by seating at home 
अर्थविश्व

आता घरबसल्या मिळवा 'यूएएन नंबर' 

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचाऱ्यांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) मिळवण्यासाठी कंपनीवर अवलंबून न राहता स्वत:च हा नंबर मिळवणे शक्‍य होणार आहे. 

सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीमार्फत युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) मिळवावा लागतो आणि त्यानंतरच ईपीेएफशी संबधित सर्व सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र आता घरबसल्या यूएएन नंबर मिळवता येणार असल्याने नोकरी बदलल्यानंतर ईपीएफ हस्तांतरित करणे, ईपीएफ काढणे, निवृत्तीवेतन आणि आयुर्विमा संरक्षणासारख्या सुविधांचा "ईपीएफओ'च्या संकेतस्थळावर "यूएएन'द्वारे प्रत्यक्ष लाभ घेता येणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीवर अवलंबून राहावे लागणार नाही.

याशिवाय "ईपीएफओ'ने 65 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतनाशी संबंधित पेन्शन पेमेंट ऑर्डरसारखी कागदपत्रे डीजीलॉकरवरून डाऊनलोड करण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. केंद्रीय श्रम मंत्री राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते या दोन सुविधांचे उद्‌घाटन झाले आहे. सध्या "ईपीएफओ'कडे 6 कोटी खातेधारक असून 12.7 लाख कोटी रुपयांचा निधी "ईपीएफओ'च्या व्यवस्थापनाखाली आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT