gold rates esakal
अर्थविश्व

दिवाळी, लग्नसराईने सोन्याचे दर तेजीकडे! 50 हजार रूपयांकडे वाटचाल

एस.डी.आहीरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मागील काही महिन्यापासून सोन्याचे दर (gold rates) गडगडल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये फिलगुडचे वातावरण होते. सुरक्षित गुंतवणुक म्हणून सामान्य नागरिक सोन्याकडे पाहतात. घसरलेल्या दरात अनेकांनी खरेदीची संधी साधली. दिवाळी सण व लग्नसराईची लगबग (diwali and wedding) यामुळे पुन्हा सोन्याच्या दराचा आलेख उंचावत आहे.पण ऐन दिवाळीत सोन्याने ५० हजार रूपयांकडे वाटचाल सुरू केली आहे.

पुन्हा सोन्याच्या दराचा आलेख उंचावतोय

पंधरा वर्षापुर्वी सोन्याचे दर सात हजार रूपये प्रती दहा ग्रॅम होते. हेच दर गेल्या दोन वर्षापासून पन्नास हजार रूपयांच्या पातळीवर आहे. हा पुर्व अनुभव पाहता गेले दोन महिने सोन्याच्या दराने प्रती तोळा सात ते आठ हजार रूपयांची घसरण झाली होती. ४७ हजार रूपयांपर्यत दर आल्याने ही मंदी अनेकांनी कॅश करत सोने खरेदी केले. सोने खरेदी आता फक्त हौसेसाठी न करता गुंतवणूक म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळे सोने खरेदीचा टक्का अनेक पटीने वाढला आहे. सुरक्षित गुंतवणुक म्हणून सामान्य नागरिक सोन्याकडे पाहतात. घसरलेल्या दरात अनेकांनी खरेदीची संधी साधली. दिवाळी सण व लग्नसराईची लगबग यामुळे पुन्हा सोन्याच्या दराचा आलेख उंचावत आहे.

दरात झळाळी येण्याचे संकेत

सोन्याचे दर दिर्घकाळ ४५ ते ४७ हजार रूपयांच्या पातळीवर राहिल्याने नागरिकांमध्ये मोठी चलबिचल होती. आता लग्नसराईला सुरूवात होत असल्याने सोने खरेदी वाढणार आहे. लग्नासाठी होणारी खरेदी दरवाढीला पुरक ठरणार आहे. आंतरराष्टीय बाजारातून तज्ञांच्या मते दरात झळाळी येणार असल्याचे संकेत आहे. त्यामुळे लवकरच सोने प्रती १० ग्रॅमला ५० हजार रूपयांच्या पुढे असेल असे जाणकार सांगतात.

मागील काही वर्षाचा विचार केल्यास सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दिवाळी बरोबरच लग्नसराईमुळे मागणी वाढत आहे. त्यामुळे दर पुन्हा पन्नास हजार रूपयांकडे झेपावतील असा अंदाज आहे. - महावीर चोपडा, श्रीनिवास ज्वेलर्स, पिंपळगाव बसवंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT