Check Today's Gold Silver Price Updates Sakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: सोनं महागलं, चांदी मात्र स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात चढउतार होत असतात. आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ घेतली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,300 आहे, जी काल 49,150 रुपये होती. म्हणजेच 10 ग्रॅममागे 150 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत-

देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 53,780 रुपये आहे. कालच्या दिवशी ही किंमत 53,620 रुपये होती. म्हणजेच 10 ग्रॅममागे 160 रुपयांनी वाढ झाली आहे. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

चांदीच्या भावात घसरण-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,400 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 68,300 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे 900 रुपयांची घसरण दिसून आली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT