Google Pay grows 3x in India in 12 months
Google Pay grows 3x in India in 12 months 
अर्थविश्व

गुगलची व्यावसायिकांसाठी ‘गुगल पे फॉर बिझनेस’ योजना

वृत्तसंस्था

पुणे : भारतातील लघु आणि मध्यम व्यवसायांच्या समुदायाला डिजिटली सशक्त बनवण्याच्या गुगलने निश्चय केला आहे. भारतात विस्तार करण्यासाठी गुगल ‘माय बिझनेस सर्व्हिस' या सारख्या गोष्टीने पुढाकार घेतला. ‘गुगल पे फॉर बिझनेस' हे विनामुल्य असून लहान आणि मध्यम आकारातील व्यवसायांसाठी डिजिटल पेमेंटस स्वीकारण्याचा सोपा मार्ग आहे.  कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या व व्हेरिफिकेशनसाठी लागणाऱ्या वेळामध्ये लक्षणीयरीत्या बचत होते.  

गुगलपे सह ग्राहक आता क्यूआर कोड वापरून किंवा फोन नंबर वापरून थेट स्टोअरमध्ये पैसे भरू शकतो. कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता लहान व्यावसायिकांना डिजिटल पेमेंट स्वीकारण्याचा लाभ मिळतो. व्यावसायिकाने कमावलेला प्रत्येक रुपया गुगल पे फॉर बिझनेसद्वारे थेट त्यांच्या युपीआय-लिंक्ड बँक खात्यात हस्तांतरित होतो.

डिजिटल पेमेंटचे अधिक फायदे शोधण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहित करताना गुगल पे आणि एनबीयु इनिशिएटिव्हजचे व्यवस्थापकीय संचालक आणि व्यवसाय प्रमुख- सजिथ सिवानंदन म्हणाले, “भारतातील एसएमबीज हे भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रमुख स्तंभ आहेत आणि गुगल पे फॉर बिझनेस सह, आम्ही देशातील युपीआयच्या प्रचंड मोठ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा डिजिटल होण्याचा आणि डिजिटल पेमेंटसह मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळवण्याच्या संधीच्या प्राप्तीसाठी मार्ग सुकर करण्याचे आमचे ध्येय आहे.”

आज जवळपास 3000हून अधिक ऑनलाईन व्यावसायिक गुगलपेशी जोडले गेले आहेत.डिजिटल पेमेंटसच्या विस्तारासाठी गुगल पे ने देशभरातील पीओएस टर्मिनल्स पादाक्रांत करून मोठ्या प्रमाणावर युपीआय पेमेंट सक्षम होण्यासाठी पाईन लॅब्ज आणि इनोव्हीटी यांच्याशी सहयोग केला आहे. यात 3,500 शहरे आणि गावांमधील 200,000 दुकानांचा समावेश आहे.

गुगलपेच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांबद्दल सविस्तरपणे सांगताना सिवानंदन म्हणाले, “सुरक्षिततेला गुगलपे प्रथम प्राधान्य देते. त्यामुळे गुगलपे स्पॅम, फसवणूक, हॅकिंगला प्रतिबंध आणि प्रत्येक वापरकर्त्याची ओळख 'व्हेरीफाय' करण्याचे काम 24/7 करत असते.” गुगल पे हे भारतातील वेगाने वाढणारे डिजिटल पेमेंट उत्पादन आहे. 3 लाखांहून अधिक शहरे, तालुके, खेडी आणि गावांमधून वापरल्या जाणाऱ्या गुगल पेचे 60 टक्क्यांहूनअधिक व्यवहार हे महानगरांबाहेर झालेले आहेत. 

गेल्यावर्षी गुगलने अॅपवरील वापरकर्त्यांसाठी अॅपवरून  रेल्वे तिकिटे बुकिंगची सेवा सुरु केली होती. याशिवाय, ग्राहक रेल्वे तिकिटे शोधू शकतात, ब्राउज करू शकतात, कन्फर्म किंवा कॅन्सल करू शकतात. आसनांची उपलब्धता पाहू शकतात तसेच प्रवासाच्या वेळासुद्धा अॅपमध्ये पाहू शकतात. तसेच एमएमटीसी-पीएएमपीच्या सुरक्षित तिजोरीमध्ये डिजिटल सोने ठेवले जाते. कोणत्याही वेळी दिवसाच्या ट्रेडिंग किंमतीनुसार वापरकर्ते हे डिजिटल सोने विकू शकतात किंवा परत घेऊ शकतात आणि अगदी त्यांच्या दारात सोने भौतिकरुपात घेण्याचा पर्याय निवडू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT