Gujarat Fluorochemicals sakal
अर्थविश्व

Gujarat Fluorochemicals : गुजरात फ्लोरोकेमिकल्सनी दिलाय 988% रिटर्न, आणखी तेजीचे संकेत

लाँग टर्ममध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

केमिकल सेक्टरमधील कंपनी गुजरात फ्लोरोकेमिकल्सच्या (Gujarat Fluorochemicals) शेअर्समध्ये काही काळापासून घसरण दिसून येत आहे. एका महिन्यात त्यात 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. पण, लाँग टर्ममध्ये याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

अडीच वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्ती सुमारे 988 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणूकीसाठी 4270 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा 41% जास्त आहे. मंगळवारी गुजरात फ्लोरोकेमिकल्सचे शेअर्स 3025 रुपयांवर पोहोचले.

27 मार्च 2020 रोजी गुजरात फ्लोरोकेमिकल्सचे शेअर्स 278.05 रुपयांवर होते. तेव्हापासून याची किंमत 988 टक्क्यांनी वाढून 3025 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या कंपनीने शॉर्ट टर्ममध्येही गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे.

ॉया वर्षी 12 मे रोजी तो 2105.15 रुपयांवर होता, जो एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर, अवघ्या पाच महिन्यांत, 6 ऑक्टोबर 2022 रोजी सुमारे 98 टक्क्यांच्या झेप घेऊन तो 4172.95 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला.

नॉनफ्लोरोपॉलिमर्स, फ्लोरोस्पेशालिटी, रेफ्रिजरंट्स आणि केमिकल्स बनवणाऱ्या गुजरात फ्लोरोकेमिकल्सच्या शेअर्समध्ये सध्या असलेली घसरण संधी म्हणून पाहा असे बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत.

बॅटरी, सौर पॅनेल आणि ग्रीन हायड्रोजनच्या संधींमध्ये वाढ होत जातेय, तशी फ्लोरोपॉलिमर्स व्यवसायाला बळ मिळेल आणि गुजरात फ्लोरोकेमिकल्सलाही त्याचा फायदा होईल. त्यामुळेच ब्रोकरेज फर्मने यासाठी 4,270 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंगसह दिले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT