how to withdraw money online from epf account during corona pandemic check process Sakal
अर्थविश्व

कोरोना काळात PF खात्यातील पैसे हवेत? घरी बसून होईल काम; पाहा प्रोसेस

सकाळ डिजिटल टीम

नवीन कोविड व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron Variant) सौम्य आहे परंतु प्रकरणे वेगाने वाढत आहेत. दररोज हजारो प्रकरणे नोंदवली जात आहेत आणि अनेक मृत्यूही होत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कोरोनामुळे उपचारासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही पीएफचे (PF Amount) पैसे काढू शकता. त्यासाठीचा अगदी सोपा मार्ग आज आपण जाणून घेणार आहोत.

सरकारच्या म्हणण्यानुसार, कोरोना साथीच्या आजाराच्या तिसऱ्या लाटेमध्ये सक्रिय प्रकरणांमध्ये मृत्यूचे प्रमाण मागील लाटेच्या तुलनेत कमी आहे. परंतु महामारीमुळे अजूनही अनेकजण आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. पगारदार वर्गाचा आर्थिक त्रास कमी करण्यासाठी सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून ठराविक रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. मार्च 2020 मध्ये, सरकारने महामारीच्या काळात रोखीच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या छोट्या व्यवसायांना दिलासा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर EPF नियमांमधील दुरुस्तीनुसार, 'एक सदस्य तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता (DA) किंवा खात्यातील शिल्लक 75 टक्के रक्कम काढू शकतो.'

जे कर्मचारी EPF मध्ये योगदान देतात ते त्यांच्या EPF खात्यातून एडव्हांससाठी अर्ज करू शकतात. पैसे काढण्यासाठी, कर्मचाऱ्याला EPFO-जारी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आवश्यक असेल आणि त्यांचे आधार, पॅन आणि बँक खाते त्यांच्या UAN शी लिंक केलेले असावे.

COVID-19 काळात EPF खात्यातून ऑनलाइन पैसे काढा

  • EPFO वेबसाइट https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface/ वर लॉग इन करा आणि ' 'Online Services' टॅब मध्ये 'Claim (Form-31, 19 and 10C)' चा पर्याय निवडा .

  • त्यानंतर तुमचे नाव, जन्मतारीख आणि तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक दिसतील आणि तुम्हाला बँक खाते क्रमांकाचे शेवटचे 4 अंक टाकण्यास सांगितले जाईल. ते एंटर करा आणि नंतर व्हेरिफाय करा या ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला Certificate of undertaking देण्यास सांगणारा एक पॉप-अप दिसेल.

  • व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर, 'Proceed for' वर क्लिक करा . त्यानंतर ड्रॉप-डाउन मेनूमधून 'PF advance (Form 31)' निवडा .

  • ड्रॉप-डाउन मेनूमधून, तुम्ही पैसे काढण्याचे कारण म्हणून 'Outbreak of pandemic (COVID-19)' निवडा.

  • त्यानंतर आवश्यक एडव्हांस रक्कम नमूद करा, पत्ता आणि बँक चेकची स्कॅन केलेली प्रत द्या.

  • तुम्हाला तुमच्या आधार खात्याशी लिंक केलेला ओटीपी मिळेल

  • OTP भरा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT