अर्थविश्व

 इंडिगोची 'माईंड ब्लोईंग' भरारी 

वृत्तसंस्था

मुंबई: इंटरग्लोब एव्हिएशन या इंडिगो एअरलाईन्सच्या मूळ कंपनीने जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत 1,203 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. इंडिगोच्या नफ्यात विक्रमी 43 पट वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत इंडिगोने 27.80 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा जास्त नफा कंपनीने कमावला आहे. विश्लेषकांनी 743 कोटी रुपयांच्या नफ्याचा अंदाज वर्तवला होता.

 इंडिगोचा महसूल 44.7 टक्क्यांनी वाढून 9,420.10 कोटी रुपयांवर पोचला आहे. 'प्रवासी वाहतूकीच्या महसूलातील वाढ आणि मालवाहतूकीतील सुधारणा यामुळे नफ्यात मोठी वाढ झाली आहे. या तिमाही निकालांनी आम्हाला आनंद झाला आहे कारण यामुळे आमच्या जलद गतीने विस्तारण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन झाले आहे', असे मत इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोन्जोय दत्ता यांनी व्यक्त केले आहे. सरलेल्या तिमाहीत कंपनीने 46.4 टक्के वाढीसह प्रवासी वाहतूकीतून 8,445.10 कोटी रुपये तर इतर पूरक व्यवसायातून 32.2 टक्क्यांच्या वाढीसह 902.60 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

 इंडिगोला क्षमतेमध्ये दुसऱ्या तिमाहीत 28 टक्क्यांची आणि संपूर्ण आर्थिक वर्षात 30 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. 30 जूनअखेर कंपनीकडे 17,337 कोटी रुपयांची रोकड शिल्लक आहे. इंडिगोवरील एकूण कर्ज 18,430 कोटी रुपये आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT