Share Market sakal media
अर्थविश्व

ओमायक्रॉनची भीती झुगारून सेन्सेक्स 619 अंश वाढला

कृष्ण जोशी

मुंबई : ओमायक्रॉनची (Omicron variant) भीती झुगारून आज जागतिक शेअरबाजारांनी (International share market) तेजी दाखविल्याने सेन्सेक्स (Sensex) 619.92 अंशांनी तर निफ्टी (Nifty) 183.70 अंशानी वाढला. जागतिक तेजीला भारतीय अर्थव्यवस्थेतील (Indian economy) सकारात्मक वातावरणाचे बळ मिळाल्याने भारतातील तेजीत भर पडली.

आज आशिया, युरोप आदी सर्वच शेअरबाजारांमध्ये वाढ दिसून आली. भारतातही चांगले जीडीपीचे आकडे, जीएसटी चे दुसरे उच्चांकी संकलन आणि वाहन उद्योगाची नोव्हेंबरमधील चांगली कामगिरी यामुळे आज गुंतवणुकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आज केवळ औषधनिर्मिती कंपन्या मंदीत होत्या, बाकी सर्व क्षेत्रांच्या शेअरची जोरदार खरेदी झाली. त्यामुळे आज भारतीय शेअरबाजार निर्देशांक दिवसभर जवळपास आजच्या उच्चांकी स्तरावरच होते.

आज धातूनिर्मिती कंपन्या तसेच वित्तसंस्थांचे शेअर विशेष तेजीत होते. कालपर्यंत घसरण दाखवीत असलेला इंडसइंड बँक आज 50 रुपयांनी वाढून 934 रुपयांपर्यंत गेला. तर 46 रुपयांनी वाढलेला टीसीएस 3,578 रुपयांपर्यंत पोहोचला. अॅक्सीस बँक (679), स्टेटबँक (475), टेक महिंद्र (1,588), मारुती (7,274), रिलायन्स इंडस्ट्रीज (2,466), लार्सन अँड टुब्रो (1,786), टाटा स्टील व एचडीएफसी या शेअरचे भाव वाढले.

तर दुसरीकडे सोमवारी जवळपास 4900 चा टप्पा गाठलेल्या डॉ. रेड्डीज लॅबची घसरण तिसऱ्या दिवशीही सुरु राहिली. आज तो 73 रुपयांनी घसरून 4,607 रुपयांपर्यंत घसरला. सनफार्मा देखील 745 रुपयांवर आला, अल्ट्राटेक सिमेंट (7,324), एअरटेल, टायटन, कोटक, एशियन पेंट, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भाव आज घसरले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 47,601 रु.

चांदी - 61,700 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT