jio smartphone 
अर्थविश्व

जिओ’चा नवा धमाका; येतोय स्मार्टफोन!

वृत्तसंस्था

मुंबई: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचा बहुप्रतिक्षित '4 जी व्हीओएलटीई' फीचर फोन लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. हा फीचर फोन दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात येणार असून या फोनमध्ये क्वालकॉम आणि स्प्रेडट्रम चिपसेट्स असतील. क्वॉलकॉमचा चिपसेट असणाऱ्या फोनची किंमत 1800 रुपये तर स्प्रेडट्रम प्रोसेसर असणाऱ्या फोनची किंमत 1740 रुपये असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फोरजी सिमसोबत सादर होणाऱ्या या फोनमध्ये विविध जिओ अॅप्सदेखील आधीपासूनच उपलब्ध असणार आहेत. या फोनच्या वैशिष्ट्यांमध्ये 2.4 इंचाची स्क्रीन, 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इंटर्नल मेमरी, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेराचा समावेश असेल. त्याचप्रमाणे, फोरजी कनेक्टिव्हीटीसह वायफाय, एनएफसी आणि जीपीएस सुविधादेखील असणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या फोनविषयी सर्वत्र चर्चा सुरु आहे. काही संकेतस्थळांवर या फोनची छायाचित्रेदेखील प्रसिद्ध झाली आहेत. कंपनी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी कदाचित अवघ्या 999 ते 1,500 रुपयांमध्येदेखील उपलब्ध करुन देऊ शकते. या फीचर फोनच्या निमित्ताने कंपनी ग्रामीण बाजारपेठेत विस्तार वाढविण्याची योजना करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

IPL 2026 मध्ये 'इम्पॅक्ट खेळाडू' चा नियम राहणार की नाही? रोहित, विराट, अक्षर यांच्या विरोधानंतर BCCI अ‍ॅक्शन मोडवर; बैठकीत बरंच काही घडलं

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात रामनवमीचा मोठा उत्साह; मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

Road Project Scam: राज्यातील रस्ते कामांत २९७ कोटींचा अनावश्‍यक खर्च;‘कॅग’चे राज्य सरकारवर ताशेरे, गंभीर त्रुटी अन् विधानसभेत काय घडलं!

SCROLL FOR NEXT