अर्थविश्व

Kia च्या Seltos साठी बुकिंग सुरू... तुम्ही बघितली का गाडी? 

वृत्तसंस्था

मुंबई: गेल्यावर्षी भारतात दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कार निर्माती कंपनी Kia Motors ने ऑटोमोबाईल क्षेत्रात जोरदार पदार्पण केले आहे. Kia कंपनीबद्दल आधीपासूनच सर्वांना उत्सुकता आहे. आता किआ मोटर्सच्या बहुचर्चित Seltos या एसयूव्हीची चर्चा सुरु झाली आहे. येत्या 22 ऑगस्ट रोजी गाडी भारतात लाँच होणार आहे. मात्र गाडी ऑगस्टमध्ये लाँच होणार असली तरी कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी 16 जुलैपासून बुकिंग सुरू झाले आहे. 

फक्त 25 हजार रुपयांमध्ये बुकिंग: 
बहुचर्चित Seltos या एसयूव्हीच्या बुकिंगसाठी फक्त 25 हजार घेतले जाणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ही कार प्रत्यक्ष ग्राहकांच्या हातात मिळणार आहे. 

काय आहेत फीचर्स?
 ही कनेक्टेड कार असून यामध्ये UVO Connect नावाची एक कनेक्टिव्हिटी सिस्टिम आहे. यात नेव्हिगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या 5 श्रेणीअंतर्गत 37 विविध फीचर्स आहेत. शिवाय अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार-प्ले आणि नेव्हिगेशनसह 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, एअर प्यूरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हॉइस कमांड, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, 6-एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट व रिअर पार्किंग सेंसर्स आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखे आधुनिक फीचर्स आहेत.

‘किआ मोटर्स’च्या या एसयूव्हीमध्ये इंजिनसाठी तीन पर्याय असतील. यातील दोन पेट्रोल तर एक डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. 
 पेट्रोलवर चालणारे 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड आणि 1.5-लिटर तर डिझेल इंजिन हे 1.5-लिटर असेल. सर्व इंजिन ‘भारत स्टेज 6’ (बीएस 6) मानकांनुसार असतील. शिवाय 1.5-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड असून दोन्ही इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध देण्यात आला आहे. तर 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनमध्ये 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशनचा पर्याय देण्यात आला आहे.

किंमत काय असेल?
 एसयूव्ही गाड्यांच्या तुलनेत Seltos (सेल्टोस) आकाराने मोठी आहे. मात्र कियाच्या Seltos ची किंमत 10 ते 17 लाख (एक्स-शोरूम किंमत) रुपये असण्याची शक्यता आहे. तसेच ऑन-रोड किंमत 12.20 लाख ते 19.7 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर निशाणा

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT