Rupee Bank sakal
अर्थविश्व

Rupee Bank : पुण्यातील रुपी सहकारी बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द!

विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच लायसन्स रद्द झाल्याने ठेवीदारांना धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पुण्यातील रुपी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द करण्यात आला आहे. कर्जदारांकडून कर्जे थकवण्यात आल्यानं ही बँक अडचणीत आली होती. बँक अडचणीत आल्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. तसेच या बँकेच्या विलिनिकरणाचे प्रयत्नही सुरु होते. मात्र, विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच लायसन्स रद्द झाल्याने ठेवीदारांना मोठा धक्का बसला आहे. (license of Rupee CoOperative Bank in Pune has been canceled by the Reserve Bank)

सन २०१७ च्या हायकोर्टाच्या आदेशानुसार रिझर्व्ह बँकेनं रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं आता सहा आठवड्यांत बॅंकेचे व्यवहार होणार बंद आहेत. बँकेत अनेकांचे पैसे अडकल्याने ठेवीदारांनी दिर्घ काळासाठी लढा दिला होता. पण बँकेच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच लायसन्स रद्द झाल्याने त्यांना धक्का बसला आहे.

रुपी सहकारी बँक ही मोठी सहकारी बँक होती. राज्याच्या बाहेरही या बँकेच्या शाखा होत्या. लाखोंच्या संख्येनं याचे ठेवीदार होते. पण कर्जदारांनी बँकेची कर्जे थकवल्यानं बँक अडचणीत आली होती. यापार्श्वभूमीवर रुपी बँकेवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले होते. यामध्ये बँकेचे आर्थिक व्यवहार रिझर्व्ह बँकेकडून आधीच थांबवण्यात आले होते. हे सर्व एकीकडे सुरु असतानाच बँकेच्या विलिनीकरणाची चर्चा दुसरीकडे सुरु होती. त्यामुळं बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता तसेच एक समितीही नेमण्यात आली होती. या समितीमार्फत बँकेच्या विलिनिकरणाची प्रक्रिया सुरु होती. अजूनपर्यंत बँकेचं विलिनिकीरण झालं नव्हतं. पण त्यातच रुपी बँकेचा परवाना रद्द झाल्यानं बँकेचे ठेवीदार, कर्मचारी आणि बँकेची संपत्ती याचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT