अर्थविश्व

महिंद्रा आणि फोर्ड एकत्र येताय

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई: वाहन उद्योगातील आघाडीच्या उत्पादक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा आणि फोर्ड मोटर कंपनी यांनी मंगळवारी (ता.1) संयुक्त उद्यम स्थापन करण्याची घोषणा केली. संयुक्त उद्यमामध्ये महिंद्राकडे 51 टक्के आणि फोर्डकडे 49 टक्के मालकी राहणार आहे. या उपक्रमातून महिंद्राकडून फोर्डच्या मोटारी विकसित करून त्यांची भारतासह उदयोन्मुख बाजारपेठेसाठी विक्री केली जाणार आहे.

फोर्डकडून भारतातील चेन्नई आणि साणंद येथील उत्पादन प्रकल्प संयुक्त उद्यमाकडे हस्तांतर केले जाणार आहेत. संयुक्त उद्यमातून ग्राहकांच्या गरजा आणि उच्च तंत्रज्ञानातून सर्वोत्तम वाहने उपलब्ध होतील, असा विश्‍वास महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी यावेळी व्यक्त केला. या भागिदारीतून फोर्ड ब्रॅंड भारतीय बाजारपेठेत सर्वदूर पोहचेल. फोर्डच्या ग्राहकांना सेवा देण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचे फोर्ड मोटर कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष बिल फोर्ड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT