अर्थविश्व

गेल्या आठवड्यात ‘टायटन’चा दबदबा!

दिवाकर कुलकर्णी

सतत दोन-तीन आठवडे तेजी अनुभवल्यानंतर गेल्या आठवड्यात बाजारानं वेग-अडथळे (स्पीड-ब्रेकर्स) अनुभवले. शुक्रवारच्या, आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बाजाराने माफक वाढ (६३ अंश-सेन्सेक्‍स) नोंदवली खरी; पण एकूणात आठवड्यात बाजार ३७१ अंश सेन्सेक्‍स व १३१ अंश निफ्टी घसरून अनुक्रमे ३३ हजार ३१४ व १० हजार ३२१ (सरासरी ०.१५ टक्के)वर बंद झाले.
तांत्रिक विश्‍लेषकांच्या मते निफ्टीला १० हजार ५८० हा टप्पा ओलांडणे जड जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जोपर्यंत या पातळीवरच्यावर बाजार बंद होत नाही, तोपर्यंत नव्याने व शाश्‍वत तेजी संभवत नाही. एका १००-१५० अंशांच्या पट्ट्यातच निफ्टी खेळत राहील. मात्र, १० हजार २५० च्या खाली निफ्टी बंद राहिल्यास काही दिवस तरी मंदीला सामोरे जावे लागेल.

वस्तू व सेवा कर परिषदेची गुवाहाटीला शुक्रवारी झालेली बैठक बाजाराला नक्कीच फलदायी होती व आहे. २८ टक्‍क्‍यांच्या करप्रणालीत येणाऱ्या २२८ वस्तूंपैकी १७८ वस्तूंचे दर १८ टक्‍क्‍यांवर खाली आणले गेले आहेत. २८ टक्के कर लागू असलेल्या वस्तू आता केवळ ५० इतक्‍याच राहिल्या आहेत. हा निर्णय बाजाराला नक्की अनुकूल होता. पण, बाजाराने ‘थांबा व पाहा’ ही भूमिका स्वीकारल्याचे दिसते. मात्र, इतर सर्व कालच्यासारखे आज किंवा थोडक्‍यात ‘बाकी सब ठिकठाक है!’ राहिले तर येत्या आठवड्यात बाजारही ठिकठाक राहू शकतो. मात्र, रोज तेजी हवी असणाऱ्यांनी जरा सजग राहावे.

सोमवारचा दिवस गाजवला ‘टायटन’ने, ६७ टक्के फायद्यातील हनुमान उडीमुळे ! (सप्टेंबर तिमाहीत तीन हजार ४७३ कोटी या ३० टक्के वाढीच्या विक्रीवर- २७८ कोटी नफा). ज्वेलरी बिझनेसवरील निर्बंध ऐन सणाच्या आधी मागे घेतल्याच्या परिणामी कंपनीला फायदा झाला. या संबंधात एक इंटरेस्टिंग किस्सा मी ‘सकाळ’च्या वाचकांबरोबर शेअर करू इच्छितो.
भारताचा ‘वॉरन बफे’ ही बिरुदावली लाभलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या बाबतीतला हा किस्सा आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे सात कोटीहून अधिक (८ टक्के) शेअर आहेत. शुक्रवारचा ‘टायटन’चा बंद भाव होता ६५७. आणि सोमवारी वर्षातला सर्वोच्च नोंदवला ८२४ (१८ टक्के वाढ!). त्यामुळं, एका दिवसात त्यांना फायदा झाला ९ वर ९ शून्य, ९०० कोटी! 

यातून स्फूर्ती घेऊन आपणही आपल्या मनगटावर ‘टायटन’ मिरवायला हरकत नाही. किंवा पत्नीला टायटन लॉकेट घेऊन द्यायला हरकत नाही. ल्यूपिन, जस्ट डायल, एल ॲण्ड टी आणि सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंका यांच्यात बरीच वर-खाली हालचाल आठवड्यात पाहायला मिळाली. ल्युपिन जोरदार बडवला; तर स्टेट बॅंक त्याचे तिमाही अहवाल फारसे आकर्षक नसूनही शुक्रवारी चांगलाच (६.२० टक्के) उचलला. ३३३ वर बंद झाला. महिंद्र ॲण्ड महिंद्र दोन टक्‍क्‍यांनी वाढून एक हजार ३९३ वर बंद झाला. कॅस्ट्रॉलच्या एकास एक बोनसपाठोपाठ महिंद्र ॲण्ड महिंद्रनेही एकास एक बोनस जाहीर केला आहे. बोनस स्ट्रिपिंग (कम बोनस शेअर विकत घेऊन एक्‍स-बोनस विकून, नॅशनल लॉसची इन्कम टॅक्‍सबरोबर वजावट घेणे)साठी या दोन्ही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही. मेनन बेअरिंग ही ऑटो ॲनसिलरीतील कंपनी (कोल्हापूरस्थित) कोल्हापूर-सांगली, कोकण परिसरातील मुकुटमणी म्हणायला हरकत नाही. मॅनेजमेंट नेहमीच

गुंतवणूकदार हितैषी राहिलेली आहे. त्यांनी चालू वर्षात दुसऱ्यांदा मध्यावधी लाभांश जाहीर केला आहे. प्रमोटर होल्डिंग सर्वोच्च अनुज्ञेय आहे. हा समभाग दीर्घ गुंतवणुकीसाठी नक्कीच लक्षवेधी ठरू शकतो. आयपीओ फ्रंटवर, महिंद्र लॉजिस्टिकनं लिस्टिग बेनिफिट काहीच दिला नाही, मात्र रिलायन्स, निप्पॉन लाइफनं १५ टक्के लिस्टिंग बेनिफिट दिला. 

न्यू इंडिया ॲशुरन्स व खादिम इंडिया दोन्हीही चालू आठवड्यात सूचिबद्ध होतील. ‘न्यू इंडिया’ला काही फायदा होण्याची शक्‍यता नाही. ‘खादिम’ला माफक फायदा व्हावा. H.D.F.C. स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स या I.P.O. लाही ‘ग्रे’ बाजारात मामुलीच प्रीमियम आहे. ‘अरविंद’चं डिमर्जन होणार आहे. त्यावरही हालचाल संभवते. 

तिसऱ्या तिमाहीत सोन्याची आवक कमी झाली आहे. प्रॉव्हिडंड फंडावरील व्याज कमी होऊ शकते. लहान गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत, या इतर घडामोडी. बॅंक ऑफ इंडिया (२०९), ब्रिटानिया (४९१७), जेट (६९६), एल ॲण्ड टी (१२७४), पेज (२२,९४०), रेडिंग्टन (२०९), सारेगम (८५५), व्होल्टास (५९२) या इतर प्रमुख व ॲक्‍टिव्ह शेअरनी गेल्या वर्षातील सर्वोच्च भाव तोडले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT