MeToo Happened
MeToo Happened 
अर्थविश्व

टाटा मोटर्समध्येही #MeToo

सकाळवृत्तसेवा

मुंबई : #MeToo मोहिमेचे वादळ आता कॉर्पोरेट क्षेत्रातही धडकले आहे. टाटा मोटर्सचे कॉर्पोरेट कॉर्पोरेशन कम्युनिकेशन्सचे प्रमुख सुरेश रंगराजन यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीचे स्‍क्रीनशॉट ट्विटरवर शेअर झाल्यानंतर रंगराजन यांनी ट्विटरवर त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

रंगराजन यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीमध्ये महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. मात्र, तक्रारीत केलेल्या आरोपाबाबत अद्याप चौकशी झालेली नाही. यावर टाटा मोटर्सकडून देखील ट्विट करण्यात आले आहे की, ''टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कंपनीकडून काळजी घेतली जाते. खासकरून महिलांची कंपनीमध्ये विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल हे देखील बघितले जाते.''

तसेच त्या ट्विटमध्ये त्यांनी पुढे सांगितले, की ''कोणत्याही तक्रारीबाबत चौकशी केली जाईल आणि चौकशीत व्यक्ती दोषी आढळल्यास त्यावर कंपनीकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल. रंगराजन यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीबाबत आम्ही चौकशी समिती नेमली असून लवकरच सत्य बाहेर येईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT