Money
Money Google
अर्थविश्व

बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित हे नियम, खिशावर होणार थेट परिणाम

सुमित बागुल

तुमच्या आयुष्याशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम थेट तुमच्या बजेटवर होईल.

तुमच्या आयुष्याशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम थेट तुमच्या बजेटवर होईल. यामध्ये आधार लिंकिंग, प्रोव्हिडंट फंड, गॅसच्या किंमती, GST रिटर्न दाखल करणे यासह आणखीही बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. हे नवीन नियम बँक अकाउंटपासून ते घरच्या आर्थिक बजेटपर्यंत सगळ्याच गोष्टींवर परिणाम करणारे आहेत.

1. LPG गॅस च्या किंमतींमध्ये वाढ

गॅसच्या किंमती मागच्या दोन महिन्यांपासून सतत वाढवल्या जात आहेत. ऑगस्टमध्ये एलपीजी गॅसच्या किंमती 25 रुपये प्रति सिलिंडर वाढवण्यात आल्या. जुलैमध्ये LPG सिलिंडर्सच्या किंमतींमध्ये 25.50 रुपयांची वाढ झाली होती. ही वाढ येत्या सप्टेंबर महिन्यातही केली जाणार आहे अशी दाट शक्यता आहे. यावर्षी जानेवारीत गॅसच्या किंमती प्रति सिलिंडर 165 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या.

2. डिफॉल्टर्ससाठी GSTR-1 दाखल करण्यास प्रतिबंध

GSTR-3B रिटर्न दाखल न केल्यास टॅक्स भरणाऱ्यांना GSTR-1 रिटर्नही दाखल करता येणार नाही, अशी माहिती गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नेटवर्कने (GSTN) दिली. केंद्रिय जीएसटी (CGST) नियमांमधील 59 (6) च्या नियमाच्या आधारे 1 सप्टेंबर, 2021 पासूनच हा नियम लागू होणार असल्याची माहितीही देण्यात आली. ज्यांनी आपला GSTR-3B रिटर्न दाखल केला नसेल तर तो तात्काळ भरावा अशी विनंती GSTN ने केली आहे.

3. आधार-PF सोबत लिंक करणे आवश्यक

तुमचे आधार कार्ड तुमच्या यूनिव्हर्सल अकाउंट नंबरसोबत (UAN) लिंक असेल तरच तुम्ही तुमच्या प्रोव्हिडंट फंडमध्ये पैसे जमा करु शकता, सप्टेंबरपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तसेच बेनिफिट घेणे, पेमेंट घेणे इत्यादी कामांसाठी हे लिकिंग अनिवार्य करण्यात आल्याचे कर्मचारी भविष्य निधि संगठनाने (EPFO) सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या धारा 142 अंतर्गत सांगितले आहे.

जेव्हा तुम्ही तुमचे आधार आपल्या UAN सोबत लिंक कराल तेव्हाच तुम्हाला याचा फायदा मिळेल. ही लिंकिंग प्रोसेस पुर्ण केल्याशिवाय कर्मचारी किंवा कंपनी त्यांचे योगदान PF अकाउंट्समध्ये करु शकणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT