Personal-Loan
Personal-Loan 
अर्थविश्व

कोविड-१९ संकटात 'पर्सनल लोन' तारेल

सुधाकर कुलकर्णी

कोरोनाच्या साथीने संपूर्ण देशभर थैमान घातले आहे. या साथीला शक्‍य तितक्‍या लवकर आटोक्‍यात आणण्याच्या दृष्टीने सरकारने सुरवातीपासूनच (२५ मार्च २०२० पासून ) लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र, लहान-मोठे व्यवसाय, ओला/उबर/रिक्षा चालक, रस्त्यावर विक्री करणारे किरकोळ विक्रेते, स्पा/सलून्स, यासारखे व्यवसाय बंद झाले आहेत, तसेच कामावर न जाऊ शकणारे छोट्या खाजगी व्यावसायिंकांकडील नोकरदारांपुढे आर्थिक समस्या उभी राहिली आहे, यावर मात करता यावी या उद्देशाने राष्ट्रीयकृत व खाजगी बॅंका, एनबीएफसी व पी२पी लेंडिंग करणाऱ्या वित्तीय संस्थांनी कोविद-१९ वैयक्तिक कर्ज योजना कार्यान्वित केल्या आहेत. प्रत्येकाच्या अटी व शर्ती थोड्याफार फरकाने सारख्याच असून किमान रु.२५,००० ते कमाल रु.५ लाख इतके कर्ज अर्जदाराच्या पात्रतेनुसार मिळू शकते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

वर उल्लीखीलेले व्याज दर प्रचलित असून यात वेळोवेळी बदलणाऱ्या रेपो लिंक्‍ड लेडिंग रेटनुसार (आरएलएलआर) बदल होत जाईल हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. याशियाय सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी त्यांचे ज्या बॅंकेत ‘सॅलरी अकाऊंट’ त्या बॅंकेकडून असे कर्ज घेऊ शकतात. असे कर्ज घेण्यासाठी नेहमी प्रमाणे ‘केवायसी’ पूर्तता तसेच कर्जाबाबतच्या अन्य आवश्‍यक बाबींची पूर्तता अर्जदाराने करणे आवश्‍यक असते. या  कोविद-१९ वैयक्तिक कर्ज योजना बहुतांश बॅंकांनी ३० जूनपर्यंत खुली ठेवली आहे.

स्टेट बॅंकेने सर्व कर्जदारांना त्यांच्या ‘वर्किंग कॅपिटल लिमिट’च्या १० टक्के इतके कर्ज ७.२५ टक्के  या निश्‍चित दराने देऊ केले आहे व या कर्जास ६ महिन्यांचा ‘ईएमआय हॉलिडे’ देऊ केला आहे, मात्र पुढील ६महिन्यात संपूर्ण कर्जाची परतफेड करावयाची आहे. मात्र वरीलपैकी कोणतेही कर्ज मागणी करताना अर्जदाराचे सध्याचे कर्ज खाते ‘स्पेशल मेन्शन अकाऊंट’ (एसएमए) १ किंवा २ असता कामा नये. अन्य कर्जांच्या तुलनेने हे कर्ज कमी व्याजात मिळत असून कर्जाच्या अटी देखील लवचिक आहेत. जर अत्यंत निकड असेल तर हे कर्ज घेऊन आपली तातडीची आर्थिक अडचण सोडविता येईल.
(सर्टिफाईड फायनान्सियल प्लॅनर,पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT