Piyush Goyal 
अर्थविश्व

कृषी, एमएसएमई उद्योजकांना पत पुरवठा वाढवणार : गोयल 

वृत्तसंस्था

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : कृषी, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांच्या (एमएसएमई) पत पुरवठ्यातील अडचणींबाबत सोमवारी (ता.28) अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांशी चर्चा केली. सार्वजनिक बॅंका नफ्यात येण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही गोयल यांनी या वेळी बॅंकांच्या प्रमुखांना दिली. 

नुकताच गोयल यांनी अर्थखात्याची अतिरिक्‍त जबाबदारी स्वीकारली आहे. येत्या 1 फेब्रुवारी रोजी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर त्यांनी बॅंकांच्या प्रमुखांशी चर्चा केली.

"एमएसएमई उद्योजकांसाठी अर्थसहाय्य, गृहकर्ज तसेच कृषी क्षेत्राकरिता विनाअडथळा पत पुरवठा करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे गोयल यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीपूर्वी रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी बॅंकांच्या प्रमुखांची भेट घेतली.

गव्हर्नपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच दास यांनी बॅंकांच्या प्रमुखांशी संवाद साधला. सार्वजनिक बॅंकांना बुडीत कर्जांबाबत अजूनही झगडावे लागत आहे. दिवाळखोरी आणि नादारी विधेयक, बॅंकांची भांडवल पर्याप्तता, कर्ज वितरण, रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध, सरकारचे भांडवली सहकार्य आदींवर या वेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेकडून येत्या 7 फेब्रुवारी रोजी चालू वर्षातील सहावे पतधोरण सादर केले जाणार आहे. डिसेंबरमध्ये घाऊक आणि किरकोळ चलनवाढीचा दर नीचांकावर आला असल्याने पतधोरणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT