

Latest Marathi News Live Update
esakal
विलग्न जुळत नसल्याने एका युवकाने रागाच्या भरात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २३) सकाळी साडेअकराच्या सुमारास देवरी तालुक्यातील धमदीटोला पळसगाव येथे घडली. हेमंत प्रकाश मडावी (वय २४, रा. धमदीटोला पळसगाव) असे मृताचे नाव आहे. हेमंत मडावी याच्या मोठ्या भावाचे लग्न जुळले. परंतु, हेमंतचे लग्न जुळत नसल्याने तो चिडचिड करीत होता. अशातच सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याने रागाच्या भरात गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी प्रकाश मंगलदास मडावी (वय ५५, रा. धमदीटोला पळसगाव) यांच्या तक्रारीवरून चिचगड पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार मरस्कोल्हे करीत आहेत.