share market
share market google
अर्थविश्व

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजार मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीवर बंद झाला. सेन्सेक्स 153 आणि निफ्टी 42 अंकांनी घसरून बंद झाला. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ऑटो, एनर्जी, बँकिंग शेअर्सवर दबाव दिसला, तर मेटल, रियल्टी, फार्मा शेअर्समध्ये हलकी खरेदी झाली.

सेन्सेक्स 153 अंकांनी घसरून 52694 वर बंद झाला, तर निफ्टी 42 अंकांनी घसरून 15732 वर बंद झाला. निफ्टी बँक 95 अंकांनी घसरून 33311 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 62 अंकांनी घसरला आणि 26716 वर बंद झाला.

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 26 शेअर्सची खरेदी झाली. त्याच वेळी, सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्स वधारले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 8 शेअर्सची खरेदी झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी मजबूत होऊन 77.99 वर बंद झाला आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
निफ्टीची सुरुवात कमजोरीने झाल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. डेली आरएसआयवर (daily RSI) बियरिश क्रॉसओव्हर दाखवत आहे. शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला निफ्टी साइडवेज दिसेल असंही ते म्हणाले. निफ्टीला डाउनसाइडवर 15650 वर सपोर्ट आणि वरच्या बाजूस 15900-16000 वर रेझिस्टन्स दिसतो.

युएस फेडचा (US FED) निर्णय बुधवारी बाजाराची दिशा ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावेल असे FitchMotilal Oswal चे सिद्धार्थ खेमका म्हणाले. जगभरातील वाढती महागाई, चीनमधील नवे निर्बंध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे बाजारावर सध्या दबाव राहील. देशांतर्गत आघाडीवर, FII ची सतत विक्री आणि रुपयाच्या कमजोरीमुळे बाजारावर नकारात्मक परिणाम होईल असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ऑरोफार्मा (AUROPHARMA)
ए यू बँक (AUBANK)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
एल अँड टी (LTTS)
एलटीपीसी लिमिटेड (NTPC)
भारती एअरटेल (BHARTIARTL)
डिवीस लॅब (DIVISLAB)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
सिप्ला (CIPLA)


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT