Share Market Update esakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजारातील वातावरण सुधारले आणि सर्वच सेक्टरमधील खरेदीमुळे सेन्सेक्स 54000 च्या वर बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी पाहायला मिळाली. हेवीवेट स्टॉक्स आणि सर्व क्षेत्रातील खरेदी यामुळे सेन्सेक्स 760.37 अंकांनी म्हणजेच 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 54,521.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 229.30 अंकांच्या म्हणजेच 1.43 टक्क्यांच्या वाढीसह 16,278.50 वर बंद झाला. (pre analysis of share market update 19 july 2022)

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?
गेल्या आठवड्यात निफ्टीमध्ये एक छोटासा कंसोलिडेशन पाहायला मिळाल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. निफ्टीने विकली चार्टवर इनसाइड बार पॅटर्न तयार केला आहे. डाउनसाइडवर, निफ्टीने 20 डीएमए आणि पीरियड चार्टवर रायझिंग चॅनेलच्या खालच्या टोकाला सपोर्ट घेतला. यामुळे निफ्टीमध्ये जोरदार वाढ झाली आहे.

सोमवारच्या व्यवहारात निफ्टीने 16,275 चा उच्चांक ओलांडला आहे. यावरून निफ्टीला वरच्या बाजूने सतत बुलबॅकचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट होते. आता निफ्टीसाठी 16500-16550 चे टारगेट समोर दिसत आहे. खाली निफ्टीला 16140-16100 वर जवळचा टर्म सपोर्ट आहे.

चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजारातील वातावरण सुधारले आणि सर्वच सेक्टरमधील खरेदीमुळे सेन्सेक्स 54000 च्या वर बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. नुकत्याच झालेल्या घसरणीमुळे काही शेअर्स अतिशय आकर्षक किंमतींवर आहेत. अशा स्थितीत आयटी, मेटल आणि टेलिकॉम शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

निफ्टीने डेली चार्टवर एक लॉन्ग बुलिश कँडल तयार केली आहे, जी येत्या काळात तेजीचे संकेत देते. 16150-16200 भक्कम सपोर्ट आहे. जर निफ्टीने ही पातळी ओलांडली तर त्यात 16400-16450 ही पातळी दिसू शकते. दुसरीकडे, जर निफ्टी 16150 च्या खाली घसरला तर तो आणखी घसरू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दाल्को (HINDALCO)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
इन्फोसिस (INFY)
टेक महिन्द्रा (TECHM)
बजाज फायनान्स (BAJAJFINSV)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)
व्होल्टास (VOLTAS)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT