Petrol
Petrol 
अर्थविश्व

पेट्रोलचा सर्वकालीन उच्चांक; सलग सातव्या दिवशी वाढ 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रुपयाचे अवमूल्यन आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. सलग सातव्या दिवशी इंधन दरवाढ झाल्याने रविवारी पेट्रोल आणि डिझेलने सर्वकालीन उच्चांक नोंदावला आहे. मुंबईत पेट्रोलने 84 रुपयांचा टप्पा ओलांडला असून, हा दर देशातील सर्वांत महागडा ठरला आहे. दिल्लीत पेट्रोल 76.24 रुपयांवर पोचले आहे. 
कर्नाटकातील निवडणुकानंतर आठवडाभर दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाने 80 डॉलरची पातळी ओलांडली आहे. त्यातच रुपया कमकुवत झाल्याने तेल आयात खर्चिक बनली आहे. 

आठवडाभरात पेट्रोल 1 रुपया 61 पैशांनी महागले. डिझेलमध्ये 1 रुपया 64 पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. रविवारी दिल्लीत पेट्रोलचा भाव 33 पैशांनी वधारला आणि 76.24 रुपयांवर पोचला. डिझेलमध्ये 26 पैशांची वाढ झाली असून डिझेलसाठी ग्राहकांना 67.57 रुपये मोजावे लागत आहे. आजच्या भाववाढीने पेट्रोलने उच्चांक गाठला आहे. यापूर्वी दिल्लीत 14 सप्टेंबर 2013 मध्ये पेट्रोलचा दर 76.06 रुपयांवर गेला होता. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये इंधनावर स्थानिक कर लावल्यामुळे येथे इंधनाचे भाव इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. 

मुंबईतील दर 
पेट्रोल : 84.07 
डिझेल : 71.94 

इंधन भडकण्याची कारणे 
खनिज तेलाने प्रती पिंपामागे 80 डॉलरची पातळी ओलांडली 
चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन, डॉलरसमोर रुपया 67.27 
इंधन दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी सुसंगत केल्याने फटका 
गेल्या तीन वर्षांतील उत्पादन शुल्क वाढीने इंधन महागले 

गोव्यात सर्वांत स्वस्त पेट्रोल 
इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील इंधन सर्वांत स्वस्त आहे. पणजीमध्ये पेट्रोलचा भाव 70.26 रुपये आहे, तर डिझेल 68.77 रुपये आहे. मेट्रो शहरांचा विचार करता दिल्लीत पेट्रोलचा भाव 76.24 रुपये, भोपाळ 81.83 रुपये, पाटणा 81.73 रुपये, हैदराबाद 80.76 रुपये आणि श्रीनगरमध्ये 80.35 रुपये आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT