अर्थविश्व

Video : आरबीआय पतधोरणाचा तुमच्यावर काय परिणाम होतो?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.35 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 5.75 टक्क्यांवरून कमी होत 5.40 टक्क्यांवर आला आहे. तसेच रिव्हर्स रेपो रेट दरात पाव टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तो आता 5.50 टक्क्यांवरून कमी होऊन 5.15 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे. 

रेपो दर म्हणजे काय?
  बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दर. यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट होत असल्याने त्याचा फायदा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. आता कर्जदर कमी झाल्याने गृह आणि वाहन कर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

रेपो दर म्हणजे ज्या दराने बॅंका रिझर्व्ह बॅंकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. रेपो रेट वाढणे म्हणजे बॅंकांना रिझर्व बॅंकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे;तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बॅंकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बॅंकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात;तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? 
रिव्हर्स रेपो दर म्हणजे रेपो दराच्या अगदी उलट संकल्पना. बॅंका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व बॅंकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बॅंक बॅंकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.

कशासाठी कपात?
मंदावलेल्या अर्थचक्राला गतीमान करण्यासाठी
वृद्धीदरातील घसरणीने अर्थव्यवस्था संकटात आहे
वित्त संस्थांमधील रोख टंचाई, बॅंकांमधील बुडीत कर्जे, गुंतवणुकीचे प्रमाण कमी होणे, वस्तूंच्या विक्रीवर परिणाम 

रेपो दरातील कपातीने काय होईल?
नजिकच्या काळात गृह आणि वाहन कर्जाचे दर कमी होतील. 

NEFT बाबत महत्त्वाचा निर्णय:
(NEFT): नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफरची (NEFT)सेवा आता आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास उपलब्ध होणार आहे. 

रिझर्व्ह बँक पुढील द्विमाही पतधोरण 4 ऑक्टोबर रोजी जाहीर करेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT