RBI sakal
अर्थविश्व

RBI चा १३ बँकांना दणका! महाराष्ट्रातील 'या' बँकांचा समावेश; वाचा काय आहे कारण?

जर तुमचे या बँकांमध्ये खाते असेल तर तुमच्यावरही या निर्णयाचा फरक पडू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष करून मध्यवर्ती बँकेच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे देशातील 13 बँकांना दंड आकारण्याची घोषणा केली आहे. सहकारी बँकांना 50 हजार ते 4 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे.

RBI नं सांगितलं की, बँकांनी नियमांचं पालन केलेलं नसल्यामुळं हा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे ग्राहकांना कोणताही आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही. तसेच, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

मध्यवर्ती बँकेने सोमवारी ही घोषणा केली आहे. 3 सहकारी बँकांपैकी रिझर्व्ह बँकेने श्री कन्यका नागरी सहकारी बँक, चंद्रपूर वर सर्वाधिक दंड ठोठावला आहे. या बँकेला चार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या बँकांच्या यादीत :

  • श्री कन्यका नागरी सहकारी बँक चंद्रपूर

  • वैद्यनाथ नागरी सहकारी बँक बीड

  • वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक सातारा

  • प्रीमियर को-ऑपरेटिव्ह बँक इंदोर

  • पाटण नागरीक सहकारी बँक, पाटण

  • नागरी सहकारी बँक, पाटण

  • द तुरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मेघालय

कोणत्या बँकेला किती दंड ठोठावला :

आरबीआयने चंद्रपूर येथील श्री कन्यका नागरी सहकारी बँकेला 4 लाख रुपये, वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बीडला 2.5 लाख रुपये दंड ठोठावला आहे. यानंतर वाय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सातारा आणि इंदूर प्रीमियर को-ऑपरेटिव्ह बँक, इंदूर यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

त्याचबरोबर पाटण नागरी सहकारी बँक पाटण आणि द तुरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मेघालय यांना प्रत्येकी 1.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मध्यवर्ती बँकेने खालील बँकांना देखील दंड ठोठावला आहे :

  • नागरी सहकारी बँक मर्यादित, अमरावती

  • ईस्टर्न आणि नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वे को-ऑपरेटिव्ह बँक अमरावती

  • जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक जगदलपूर कोलकाता

  • जिल्हा सहकारी बँक -ऑपरेटिव्ह सेंट्रल बँक मर्यादित कोलकाता

  • जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित छतरपूर

  • सेंट्रल बँक मर्यादित रायगड

  • शाहडोल को-ऑपरेटिव्ह बँक शहडोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT