Inflation  sakal
अर्थविश्व

Retail Inflation : सामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ महागाई दर निचांकीवर

गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या महागाईने सामान्यांचं कंबरडं मोडलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

Retail Inflation : वाढत्या महागाईत सामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर एका वर्षातील नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.

डिसेंबर हा सलग दुसरा महिना आहे. जेथे किरकोळ महागाई RBI च्या 4 (+/- 2) टक्क्यांच्या टॉलरेंस बँडच्या जवळ आला आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 6.77 टक्के होता तर, नोव्हेंबरमध्ये हा दर 5.88 टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता.

डिसेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात अन्नधान्याच्या महागाईत घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागात खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.05 टक्के नोंदवण्यात आला आहे. हा दर नोव्हेंबरमध्ये 5.22 टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता. 

तर शहरी भागात डिसेंबर महिन्यात अन्नधान्यचा महागाई दर 2.80 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे, जो नोव्हेंबरमध्ये 3.69 टक्क्यांवर होता. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर 15.08 टक्क्यांवर नोंदवण्यात आला असून, फळांच्या भाववाढीचा दर दोन टक्के राहिला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महागाई दर 8.51 टक्के, अंड्यांचा महागाई दर 6.91 टक्के आणि मसाल्यांच्या महागाईचा दर 20.35 टक्के नोंदवण्यात आला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT