rules recently issued by SEBI Paying for IPO Up to Rs 5 lakh can be paid through UPI
rules recently issued by SEBI Paying for IPO Up to Rs 5 lakh can be paid through UPI sakal
अर्थविश्व

‘आयपीओ’साठीचा भरणा आता आणखीनच सुलभ!

सुहास राजदेरकर

‘सेबी’ने नुकत्याच जारी केलेल्या नियमांनुसार, प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम आता ‘यूपीआय’द्वारे भरता येईल. याआधी त्याची मर्यादा दोन लाख रुपये होती. काय आहेत हे नियम, थोडक्यात पाहूया.

संगणकीकरणामुळे बँकिंग पद्धती जसजशा सक्षम होत गेल्या, तसतसे पैसे देण्याघेण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. २००८ पासून ‘ॲस्बा’ अर्थात ‘ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट’ प्रचलित झाल्यानंतर धनादेश अर्थात चेक देणे जवळपास बंदच झाले. ‘आयपीओ’साठी ‘ॲस्बा’ लोकप्रिय झाले. ‘ॲस्बा’ पद्धतीमध्ये, तुम्ही अर्ज केलेले पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये अडविले जातात. तुम्हाला जितके शेअर मिळतील, तेवढी रक्कम वजा होऊन बाकी रक्कम मोकळी होते. व्याजाचे नुकसान होत नाही. धनादेश द्यावा लागत नाही. त्यानंतर, २०१४ पासून ऑनलाइन पैसे हस्तांतरित करण्याच्या नवनवीन पद्धती आल्या; ज्यामुळे रोख पैशांचे व्यवहार खूप कमी झाले. २०१६ मध्ये ‘यूपीआय’ अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस पद्धत अस्तित्वात आली; ज्यामध्ये वेगवेगळे ॲप आले, जसे की भीम, पेटीएम, गुगल आदी. नोव्हेंबर २०१८ पासून ‘आयपीओ’मध्ये ‘युपीआय’द्वारे भरणा करणे शक्य झाले. परंतु, ही नवी पद्धत प्रचलित होऊन त्याची घडी नीट बसेपर्यंत, तसेच त्यामध्ये फसवणूक होऊ नये म्हणून त्याला दोन लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली.

‘एनपीसीआय’ अर्थात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने सर्व चाचण्या करून डिसेंबर २०२१ मध्येच, ‘आयपीओ’साठी ‘ॲस्बा’ पद्धतीच्या अर्जदारांसाठी, ‘यूपीआय’द्वारे दोन लाख रुपये रकमेची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढविण्यास परवानगी दिली होती. आज, ८० टक्क्यांच्या वर सर्व मध्यस्थ संस्था हा नवा बदल स्वीकारण्यास सक्षम झाल्या आहेत. या सर्वांची खातरजमा करून ‘सेबी’ने चार महिन्यांनंतर आता हे बदल जाहीर केले आहेत, ज्याची अंमलबजावणी, येत्या एक मे २०२२ पासून करण्यात येईल.

‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार आता पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम ‘यूपीआय’द्वारे भरू शकतील. यासाठी त्यांना ‘बीड-कम-ॲप्लिकेशन’मध्ये ‘युपीआय-आयडी’ नंबरचा उल्लेख करावा लागेल. गुंतवणूकदार हे अर्ज ऑनलाइन किंवा आॅफलाइन करू शकतात. या बदलांमुळे, गुंतवणूकदारांना बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता लागणार नाही. ‘आयपीओ’मध्ये भरणा करण्याच्या इतर पद्धतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ‘आयपीओ’मध्ये, रिटेल विभागासाठीची जी दोन लाख रुपयांची मर्यादा आहे, त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि ती मर्यादा दोन लाख रुपये इतकीच आहे. येणाऱ्या काळात ‘सेबी’ त्यामध्येही सुधारणा करून ही मर्यादा दोन लाख रुपयांवरून पाच लाख करण्याची अपेक्षा करू या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT