Sarita Bhide writes value investing Why pay attention investment finance
Sarita Bhide writes value investing Why pay attention investment finance  sakal
अर्थविश्व

‘मूल्य गुंतवणुकी’कडे लक्ष का द्यावे?

सकाळ वृत्तसेवा

व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग किंवा ‘मूल्य गुंतवणूक’ म्हणजे काय, हे आधी आपण समजून घेतले पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचे, तर याचा अर्थ सवलतीत (डिस्काउंटवर) उपलब्ध असलेल्या संधी शोधणे.

- सरिता भिडे

व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग किंवा ‘मूल्य गुंतवणूक’ म्हणजे काय, हे आधी आपण समजून घेतले पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचे, तर याचा अर्थ सवलतीत (डिस्काउंटवर) उपलब्ध असलेल्या संधी शोधणे. शेअरचा विचार केल्यास याचा अर्थ अशा कंपन्यांची निवड करणे, ज्यांचे मूल्य त्यांच्या क्षमतेच्या तुलनेत सध्या कमी आहे. शेअरचे मूल्य कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. यापैकी एक म्हणजे कंपनी प्रसिद्धीच्या झोतात आली नसल्याने कंपनीच्या चांगल्या कामगिरीकडे कोणाचे फार लक्ष गेले नाही किंवा काही मोजक्याच गुंतवणूकदारांनी त्यात रस दाखवला आहे. दुसरे कारण असे असू शकते, की काही बाह्य कारणांमुळे कंपनीच्या शेअरचा भाव घसरला आहे अथवा त्याच्या शेअरवर बाजारातील सुधारणांचा परिणाम झाला आहे. मात्र, कंपनीच्या व्यवस्थापनात किंवा व्यवसायात कोणताही मोठा बदल झालेला नाही. त्यानंतर विशिष्ट क्षेत्रात चक्रीय बदल (cyclical changes) देखील होत असतात. एखादे क्षेत्र जे गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करत असेल, ते कदाचित उच्च मूल्याच्या क्षेत्रात गेले असेल, तर अलीकडच्या काळात चांगले काम न करणाऱ्या दुसऱ्या एखाद्या क्षेत्राला आता चांगली संधी मिळू शकेल.

‘व्हॅल्यू’मध्ये गुंतवणूक का करावी?

सप्टेंबर २०२० पर्यंत जसे, की याआधी १९८८-८९ आणि २००७-२००८ मध्येही झाले होते; मूल्य प्रवाहाबाहेर होते. कोविड महासाथ कमी झाल्यावर एक ‘थीम’ म्हणून ‘व्हॅल्यू’वर लक्ष केंद्रित केले गेले. सध्या राजकीय आणि आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. रशिया-युक्रेन संघर्षामधील कोणत्याही सकारात्मक घडामोडीमुळे बाजारातील भावना आणि वस्तूंच्या किमती बदलू शकतात. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि बाजारावरही होऊ शकतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर पुढील १२ महिने इक्विटी गुंतवणुकीच्या दृष्टीने अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे आर्थिक तज्ज्ञ आणि बाजार निरीक्षकांचे सर्वसाधारण मत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण ‘व्हॅल्यू’ गुंतवणुकीतील संधी शोधेल. याशिवाय बाजार उच्च पातळीवर असताना ‘व्हॅल्यू’ गुंतवणूक चांगली कामगिरी करते आणि ‘व्हॅल्यू’ अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यावर केंद्रित आहे, जे ‘फेव्हर’च्या बाहेर असतात; परंतु दीर्घकाळासाठी त्यांची ‘व्हॅल्यू’ आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी कंपनीच्या प्रत्येक तपशीलाचा मागोवा ठेवणे आणि परिणामी बाजारातील प्रत्येक परिस्थितीत ‘पॉकेट व्हॅल्यू’ शोधणे सोपे काम नाही. म्हणूनच दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी व्यावहारिक दृष्टीकोन हा ‘व्हॅल्यू’ गुंतवणुकीच्या थीमवर लक्ष केंद्रित करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याचा असायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का! पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ स्वस्तात बाद

SCROLL FOR NEXT