saving money india
saving money india 
अर्थविश्व

वाचवलेला पैसा हा मिळकतीसारखाच! (पैशाच्या वाटा)

शिरीष काळे

पैशाला दोन वाटा असतात. एक मिळकतीची व दुसरी खर्चाची. मिळकतीच्या व खर्चाच्या वाटेचेही दोन प्रमुख भाग करता येतील. एक वैध मार्गाने मिळणारा, दुसरा अवैध मार्गाने मिळणारा पैसा. तसेच वैध कारणाकरिता खर्च होणारा पैसा व अवैध कारणांकरिता खर्च होणारा पैसा. कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रेरणा मिळत असते, पण त्या प्रेरणेला तुम्ही कशाप्रकारे, कशाकरिता प्रतिसाद देता, हे सर्वांत महत्त्वाचे ठरते. पैशाच्या बाबतीत तर हे अत्यंत कळीचे ठरते. जर मिळणारा पैसा मर्यादित स्वरुपाचा असेल, तर अशावेळी खर्चाच्या प्रेरणेला दिला जाणारा प्रतिसाद हा अधिक महत्त्वाचा ठरतो. जर तो वैध कारणासाठी दिला गेला नाही, तर कर्जबाजारीपणा येऊ शकतो अथवा प्रसंगी अवैध मार्गाने पैसा मिळविण्यासाठी प्रतिसाद दिला जाणे शक्‍य असते. खर्चाला फुटणारी वाट नियंत्रित करणे हेच खरे संपत्ती नियमनाचे गमक आहे. नियमित व सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा पाया बचतीतच असतो. यासाठी खर्चावर जो नियंत्रण मिळवितो, तोच संपत्ती जमा करण्यात निश्‍चित यशस्वी होतो. नियमित उत्पन्नाला जोड व्यवसायाच्या पर्यायातून वैध मार्गाने पैसा कमविला तरी तो वैध कारणासाठी खर्च होणे अपेक्षित असते. थोडक्‍यात, अक्कलहुशारीने खर्च करणे किंवा खर्च नियंत्रणात ठेवणे म्हणजे एकप्रकारे पैसा मिळविल्यासारखेच आहे. यासाठी पुढीलप्रमाणे काही सोपे उपाय करता येऊ शकतात - 1) खर्चाचे अंदाजपत्रक मांडणे, 2) अचानक येऊ शकणारे खर्च विचारात घेऊन तरतूद करणे, 3) खरेदीला निघताना कोणत्या गोष्टी खरेदी करावयाच्या आहेत, याची यादी करूनच बाहेर पडणे, 4) घरातून निघताना आवश्‍यकतेपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ न बाळगणे, 5) डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्ड बरोबर ठेवणे म्हणजे खर्च करण्यापूर्वी विचार केला जाईल, 6) वस्तू खरेदी करताना तिच्या दीर्घकाळ वापराचा अथवा त्या वस्तूचे आयुर्मान विचारात घेऊन खरेदी करण्याचा विचार करणे.

यासारखे अनेक साधे उपाय अमलात आणून आपल्या खर्चावर नियंत्रण आणणे शक्‍य आहे. वाचवलेला किंवा बचत केलेला पैसा हा मिळकतीसारखाच असतो. तेव्हा पैशाला खर्चाची वाट दाखविण्याअगोदर त्या खर्चासाठी निर्माण झालेली प्रेरणा व त्याला तुम्ही देत असलेला प्रतिसाद यात जो वेळ मिळतो, त्या वेळात सारासार विचार करून योग्य खर्च करणे जास्त गरजेचे असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT