अर्थविश्व

स्टेट बँकेकडून ठेवींवरील व्याजदरात वाढ

वृत्तसंस्था

मुंबई: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने मुदत ठेवींवर अधिक व्याज देऊ केले आहे. विविध मुदतीच्या ठेवींवर बँकेने 0.05-0.10 टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने चालू वर्षात तिसऱ्यांदा मुदत ठेवींवरील व्याजदर वाढविले आहेत. नवीन व्याजदर आजपासून (बुधवार) लागू होणार आहेत. 

स्टेट बँकेने बुधवारी घेतलेल्या निर्णयात, एक वर्षांहून अधिक मुदतीच्या गटातील ठेवींवरील व्याजदर 0.05 टक्क्याची वाढ केली आहे. एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मात्र एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदतीकरिता वार्षिक 6.8 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे, तर तीन ते पाच वर्षे मुदतीकरिता 6.8 टक्के व्याजदर मिळेल. पाच ते दहा वर्षे मुदतीच्या ठेवींवर 6.85 टक्के व्याजदर असेल.

अधिक माहितीसाठी www.sakalmoney.com ला भेट द्या 

ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर आजपासून सुधारित व्याजदरांप्रमाणेच असतील. आता त्यावर वार्षिक 7.3 टक्के दराने व्याज मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT