Tamilnad Mercantile Bank, IPO
Tamilnad Mercantile Bank, IPO Sakal
अर्थविश्व

तामिळनाड मर्कंटाइल बँकेच्या आयपीओला सेबीकडून मंजुरी, अधिक माहिती जाणून घ्या

शिल्पा गुजर

खासगी क्षेत्रातील बँक तामिळनाडू मर्कंटाइल बँकच्या (Tamilnad Mercantile Bank) IPO ला SEBI कडून मंजुरी मिळाली आहे. या IPO मध्ये, 15827495 इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू असेल तर 12505 इक्विटी शेअर्सची ऑफ-फॉर सेल असेल. या ऑफर फॉर सेलमध्ये, डी प्रेम पलानिवेल, प्रिया राजन, प्रभाकर महादेव बोबडे, नरसिंहन कृष्णमूर्ती, एम मल्लीगा राणी आणि सुब्रमण्यम वेंकटेश्वरन अय्यर त्यांचे शेअर्स विकतील. तमिळनाडू मर्कंटाइल बँकेचे (Tamilnad Mercantile Bank) मुख्यालय तुतीकोरीन, तमिळनाडूमध्ये आहे. बँक या IPO च्या ताज्या इश्यूमधून मिळालेल्या पैशांचा वापर तिचा टियर 1 कॅपिटल बेस वाढवण्यासाठी आणि भविष्यातील भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी करेल.

तामिळनाडू मर्कंटाइल बँक ही देशातील सर्वात जुन्या खासगी बँकांपैकी एक आहे. त्याचा इतिहास सुमारे 100 वर्षांचा आहे. हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कृषी आणि किरकोळ ग्राहकांना आर्थिक आणि बँकिंग सेवा प्रदान करते. 30 जून 2021 पर्यंत, बँकेच्या 509 शाखा होत्या त्यापैकी 106 शाखा ग्रामीण भागात होत्या तर 247 निमशहरी भागात होत्या. तर 80 शाखा शहरी भागात आणि 76 महानगरांमध्ये होत्या. बँकेचा व्यवसाय गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये पसरलेला आहे. ऍक्सिस कॅपिटल, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर्स आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत."

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT