Sensex
Sensex 
अर्थविश्व

निर्देशांकांचा उच्चांकी प्रवास सुरूच

पीटीआय

मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीचा उच्चांकी प्रवास मंगळवारी सुरूच राहिला. सेन्सेक्‍स आज १०६ अंशांनी वधारून ३६ हजार ८२५ अंशांवर बंद झाला, तर निफ्टी ४९ अंशांची वाढ होऊन ११ हजार १३४ अंशांवर बंद झाला. 

सेन्सेक्‍स आणि निफ्टी आज सार्वकालिक उच्चांकी पातळीवर बंद झाले. कालही सेन्सेक्‍स उच्चांकी पातळीवर बंद झाला होता. आज सेन्सेक्‍सने ३६ हजार ९०२ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. याआधी निफ्टी २९ जानेवारीला ११ हजार १३० अंश या उच्चांकी पातळीवर बंद झाला होता. आज ही पातळी ओलांडून तो ११ हजार १३४ अंशांवर बंद झाला. 

परकी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर शेअर बाजारात वाढला आहे. काही कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले लागल्याने गुंतवणूकादारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यातच जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणाचाही चांगला परिणाम होत आहे.

तेजीच्या लाटेवर 
एल ॲण्ड टी, एशियन पेंट्‌स, वेदांत, टाटा स्टील, कोल इंडिया, एम ॲण्ड एम, अदानी पोर्टस, मारुती सुझुकी, ॲक्‍सिस बॅंक, एचडीएफसी, पॉवर ग्रीड, ओएनजीसी, टाटा मोटर्स, आयटीसी, इंड्‌सइंड बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांच्या समभागात ३.३६ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.

एसीसीमध्ये १२.८६ टक्के वाढ 
सिमेंट क्षेत्रातील एसीसी कंपनीच्या समभागात आज १२.८६ टक्के वाढ झाली. कंपनीच्या पहिल्या तिमाही नफ्यात किरकोळ वाढ झाली आहे. कंपनीला ३२९ कोटी रुपयांचा तिमाही नफा झाला आहे. गुंतवणूकदारांनी पसंती दिल्याने कंपनीच्या समभागात तेजी निर्माण झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT