अर्थविश्व

CarTrade शेअर्स लिस्टिंगच्याच दिवशी 9 टक्क्यांनी घसरले

सुमित बागुल

कारट्रेडचे (CarTrade) शेअर्स लिस्टिंगच्याच दिवशी 9 टक्क्यांनी घसरले, गुंतवणुकदारांनी नेमके काय करावे ? जाणकारांची मते जाणून घेऊयात.

कारट्रेडची (CarTrade) शेअर बाजारातली सुरुवात खराब राहिली. 20 ऑगस्टला इंट्रा डेमध्ये कारट्रेड टेकचे (CarTrade Tech) शेअर्स 8.8 टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे शेअर बाजार फक्त 1 टक्क्याने घसरला होता. बीएसइवर (BSE) कारट्रेडच्या (CarTrade) शेअर्सची लिस्टिंग इश्यू प्राइस (IPO) 1.11 टक्क्याने घसरुन 1600 रुपयांवर आली. लिस्ट झाल्याच्या दिवशीच कारट्रेडच्या (CarTrade) शेअर्सने 1476 निच्चांकी रुपयांवर पोहोचला. कारट्रेडचा (CarTrade) इश्यू प्राइस 1618 रुपये होता, 20 ऑगस्टला लिस्टिंगच्या दिवशी बाजार संपल्यावर कारट्रेडचे (CarTrade) शेअर्स 1491 रुपयांवर आले.

गुंतवणुकदारांना लिस्टिंगच्याच दिवशी प्रॉफिट बुकिंग करण्याचा सल्ला दिल्याचे मेहता इक्विटिजचे उपाध्यक्ष (रिसर्च) Vice President Of Mehta Equities (Research) प्रशांत तापसी यांनी म्हटले. काही गुंतवणूकदार ज्यांना हा आयपीओ लागला नाही आणि ते ज्यांना लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूक करायची होती त्यांना आम्ही वाट बघायला सांगितल्याचेही मेहता म्हणाले.

मल्टीचॅनल ऑटो प्लॅटफॉर्मचा ऍसेट लाइट बिझनेस मॉडेलचा (Multichannel Auto Platform Asset Light Business Model) गुंतवणूकदारांना फायदा होईल असा विश्वासही प्रशांत तापसी यांनी व्यक्त केला. कारट्रेडचा (CarTrade) व्यवसाय नफ्यात आहे. धोका पत्करु शकणारे गुंतवणूकदार दिर्घ काळासाठी कारट्रेडच्या (CarTrade) शेअर्समध्ये गुंतवणूक करु शकतात असेही ते म्हणाले. कारट्रेडचा (CarTrade) इश्यू हा ऑफर फॉर सेल (Offer For Sale) होता. या आयपीओच्या मदतीने कंपनीने एकूण 2998.51 कोटी रुपये जमवले.

गुंतवणुकदारांनी शेअर्समधील काही भागाचा नफा बूक करावा आणि बाकीचे शेअर्स दिर्घ काळासाठी ठेवावे असा सल्ला हेम सिक्युरिटीजच्या (Hem Securities) वरिष्ठ संशोधन विश्लेषक (Senior Research Analist) आस्था जैन यांनी दिला.

कारट्रेड (CarTrade) हा एकमेव प्रॉफिटेबल ऑटोमोटिव्ह डिजिटल प्लॅटफॉर्म (Proffitable Automotive Digital Platform) आहे. याचा ऍसेट लाइट मॉडेल आहे आणि EBIDTA मार्जिनही चांगली आहे. जे गुंतवणुकदार 2-3 वर्षांसाठी थांबू शकतात त्यांना नक्कीच फायदा होईल अशी माहिती कॅपिटलवाया ग्लोबल रिसर्चचे मुख्य (CapitalVia Global Research head) गौरव गर्ग यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT