Share Market News  Sakal
अर्थविश्व

Share Market Closing : 144 अंकांच्या तेजीसह बाजार बंद; बँक निफ्टी पहिल्यांदाच 44,000 च्या वर

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing : शेअर बाजाराने सलग दुसऱ्या सत्रात तेजी नोंदवली आहे. सेन्सेक्स 144 अंकांच्या वाढीसह 62677 वर बंद झाला, तर निफ्टी 52 अंकांच्या वाढीसह 18660 वर बंद झाला. बँक निफ्टीने आज पहिल्यांदा 44 हजारांचा टप्पा ओलांडला आणि बंद झाला. व्यापारादरम्यान बँक निफ्टीने 44,151 वर व्यवहार करत नवीन उच्चांक गाठला आहे.

टॉप-30 सेन्सेक्समध्ये 21 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 9 शेअर घसरणीसह बंद झाले. टाटा स्टील, टेक महिंद्रा, एनटीपीसी, स्टेट बँक आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक तेजीत होते. नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेंट्सला सर्वाधिक नुकसान झाले.

BSE India

बाजारात तेजी का आहे?

मंगळवारी अमेरिकेतील नोव्हेंबर महिन्याच्या महागाई दराच्या आकड्यांनुसार, नोव्हेंबर महिन्यातील महागाईचा दर 12 महिन्यांतील सर्वात कमी 7.1 टक्क्यांवर आहे. आज यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करू शकते. परंतु महागाईच्या ताज्या आकडेवारीनंतर व्याजदर वाढवण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे भारतातील आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली.

BSE India

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 290 लाख कोटी रुपयांनी वाढून 291.07 लाख कोटी रुपये झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT